Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ ट्रॅव्हल कंपनीला झटका; ग्राहकांना मिळणार व्याजासह पैसे..!

नाशिक :

Advertisement

ग्राहकांचे अधिकार हा फ़क़्त कागदोपत्री विषय नसून ग्राहक जर लढला आणि त्याला पुराव्यांची जोड असेल तर कंपन्यांना याचा मोठा झटका बसू शकतो. असाच झटका नाशिक येथील एका ट्रॅव्हल कंपनी आणि एजंटला बसला आहे.

Advertisement

निम हाॅलिडेज व स्थानिक टूर कंपनी यांनी संयुक्तरित्या युराेप टूरसाठी पैसे गोळा केले होते. मात्र, मध्येच करोना विषाणूचे संकट कोसळले. परिणामी ही सहल रद्द झाली. मात्र, त्याचे पैसे ग्राहकांना मागे देण्याकडे कंपनीने दुर्लक्ष केले. परिणामी ग्राहकांनी जिल्हा ग्राहक अायाेगाकडे दाद मागितली.

Advertisement

नाशिकसह पुणे, नागपूर, सांगली, ठाणे येथील जिल्हा ग्राहक अायाेगात टूर कंपन्यांनी पैसे परत न केल्याचे दावे दाखल करण्यात अाले हाेते.  टूर कंपनीने २०१७ मध्ये मुंबईनाका परिसरातील एका ग्राहकाचे युराेप टूरकरिता तीन लाख १७ हजार रुपयांचे पॅकेज देत रक्कम घेतली होती.

Advertisement

टूरसंबंधित व्हिसा न मिळणे, संपर्क केला असता प्रतिसाद न मिळणे अशा कारणांनी वैतागलेल्या ग्राहकाने अखेर जिल्हा ग्राहक अायाेगात दावा दाखल केला हाेता. या दाव्याच्या सुनावणीनंतर ग्राहक अायाेगाचे अध्यक्ष मिलिंद साेनवणे, सदस्या प्रेरणा काळुंखे-कुलकर्णी, सदस्य सचिन शिंपी यांनी निकाल दिला आहे.

Advertisement

निकालात निम हाॅलिडेज व स्थानिक टूर कंपनी यांनी संयुक्तरित्या युराेप टूरसाठी भरलेली तीन लाख १७ हजार रुपयांची रक्कम ११ मे २०१७ पासून ते प्रत्यक्ष रक्कम हाती मिळेपर्यंत वार्षिक नऊ टक्के व्याजासह तक्रारदाराला अदा करावी असे स्पष्ट म्हटले आहे.

Loading...
Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply