Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

म्हणून तपास यंत्रणेला जाता येईना प्रकरणाच्या मुळाशी; वाझेंनी केलाय ‘हा’ प्रकार

मुंबई :

Advertisement

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडल्याने आणि त्यात मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचचे अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांचा हात असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली. आता तपास यंत्रणा निक्षून पुरावे शोधत आहेत. मात्र वाझेंनी केलेल्या काही गोष्टींमुळे तपास यंत्रणेला प्रकरणाच्या मुळाशी जाणे, कठीण होऊन बसले आहे.

Advertisement

सचिन वाझे यांनी NIAच्या कार्यालयात येताना स्वत:चा मोबाईल फोन आणलाच नाही. हा फोन घरी राहिल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, सचिन वाझे यांचे कुटुंबीयही गायब आहेत. गेल्या काही दिवसांपासून सचिन वाझे यांच्या ठाण्यातील घरी कोणीच नाही. त्यामुळे NIA च्या याप्रकरणाच्या मुळाशी जाण्यात अद्याप यश मिळालेले नाही. 

Advertisement

अशातच सचिन वाझे यांच्यावरील कारवाईच्या विरोधात त्यांचा भाऊ सुधर्म वाझे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. माझ्या भावाला एनआयएने बेकायदेशीरपणे ताब्यात घेऊन अटक केली आहे, असा दावा सुधर्म वाझे यांनी याचिकेत केला आहे. 

Advertisement

सचिन वाझे यांच्या अटकेनंतर क्राईम इंटेलिजन्स युनिटने (CIU) पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. वाझे यांना अटक केल्यानंतर एनआयए वाझे यांच्या घराजवळील आणि इतर ठिकाणच्या सीसीटीव्ही व डीव्हीआरच्या शोधात होती. मात्र, सीसीटीव्ही आणि डीव्हीआर वाझे यांच्या टीममधील अधिकाऱ्यांनी तपासाचे कारण देत नेल्याचे एनआयएच्या सूत्रांनी सांगितले आहे.

Loading...
Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply