Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

महत्वाची बातमी : कांदा उत्पादकांच्या एल्गार; हमीभावासाठी पुकारले आंदोलन..!

नाशिक :

Advertisement

कांदा हे नगदी आणि राजकीयदृष्ट्या खूप संवेदनशील असे पिक आहे. अनेक सरकार निवडून येण्यासह चारीमुंड्या चीत करण्यासाठी कांदा हा घटक खूप महत्वाचा ठरला आहे. मात्र, तरीही या महत्वाच्या पिकाला साधा हमीभाव मिळत नाही. हाच मुद्दा पटलावर आणून राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी लासलगाव बाजार समितीतून आंदोलन पुकारले आहे.

Advertisement

आपला कांदा, आपलाच भाव’ या मोहिमेची सुरुवात सोमवारपासून करण्यात आली आहे. त्यामध्ये कांद्याला किमान प्रति किलो ३० रुपयांचा दर मिळण्याची मागणी करण्यात आलेली आहे. दिघोळे यांनी लासलगाव बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद साधत या मोहिमेचे स्वरूप व दिशा काय असेल हे स्पष्ट केले.

Advertisement

त्यांनी म्हटले की,  केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीच्या धरसोड वृत्तीमुळे जागतिक बाजारपेठेमध्ये भारतीय कांद्याला कायमस्वरूपी हक्काची बाजारपेठ मिळवणे शक्य झालेले नाही. कांद्याचे ठोस असे कुठलेही धोरण ठरलेले नसल्याने या अडचणी येत आहेत.

Advertisement

सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख, आमदार, खासदार, केंद्रीयमंत्री, मुख्यमंत्री यांची भेट घेऊन कांद्याला हमीभाव मिळावा ही लेखी मागणी केली जाणार आहे. कांद्याला एकरी ६५ ते ७० हजार रुपये खर्च येत असताना दरवर्षीच एक-दोन महिन्यांचा अपवाद वगळता राज्यभरातील सर्वच बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत असतो.  अशावेळी येणारा तोटा कोणीही लक्षात घेत नाही.

Loading...
Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply