Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्यांना झटका; पाईपचे भाव झाले दुप्पट, रिलायंसची निर्यात जोरात..!

पुणे :

Advertisement

शेतमालास जरा कुठे बरे भाव मिळत असल्याचे चित्र समोर आलेले असतानाच दुसऱ्या मार्गाने शेतकऱ्यांचे खिसे मोकळे करण्याचे उद्योग जोरावर आहेत.  पीव्हीसी पाइपबाबत असाच मोठा झटका शेतकऱ्यांना बसला आहे. सध्या दर हे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्याच्या पलीकडे गेले आहेत. 

Advertisement

पेट्रोलिअम कंपन्यांशी निगडीत असा हा व्यवसाय आहे. तसेच भारतात रिलायंस ग्रुपची या सेक्टरमध्येही चलती आहे. जगभरात सध्या पाइपसाठी लागणारी पावडर महाग झाली आहे. त्यातच रिलायंस ग्रुपने जागतिक बाजाराचा लाभ घेण्यासाठी याची निर्यात जोमात सुरू केल्याने भारतात याचा अभूतपूर्व असा तुटवडा निर्माण झाला आहे.

Advertisement

परिणामी मागील फ़क़्त दोन वर्षांचा विचार केल्यास पाईपचे भाव तब्बल दुप्पट वाढलेले आहेत. सिंचनासाठी लागणाऱ्या पाइपच्या दरात वर्षभरात तब्बल ७० टक्के वाढ झाली आहे. पीव्हीसी पाइप उत्पादनात वापरला जाणारा कच्चा माल तेल उद्योगातून निर्माण होतो. भारतामध्ये प्रामुख्याने अमेरिका व चीन यासह जवळपास दोनशे देशातून पाइपसाठी लागणारी ही पावडर आयात केली जाते. मात्र, जगभरात याचा तुटवडा आहे.

Advertisement

कोरोनानंतर परदेशातील हे उद्योग बंद झाले. याचा परिणाम पाइप उद्योगावर झाला आहे. रिलायन्स उद्योगातूनही या पावडरचा पुरवठा देशभरातील पाइप उद्योगासाठी होत होता. मात्र, जगाच्या बाजारपेठेत पावडरचे दर वाढल्यामुळे रिलायन्सन परदेशात निर्यात वाढवली. परिणामी पीव्हीसी पाइपचे दर प्रचंड प्रमाणात वाढले आहेत.

Loading...
Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply