Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

पुन्हा एकदा हॉटेलबंदी; पहा कोणत्या शहरात घातली ‘बाहेरच्या खाण्या’वर बंदी..!

औरंगाबाद :

Advertisement

वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाकडून निर्बंध अधिकच कडक केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद येथील जिल्हाधिकाऱ्यांनी आज आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे हॉटेलबंदीचा..!

Advertisement

रेस्टॉरंट, हॉटेल, परमीट रूम, नाश्ता सेंटर, धाबे, फूड पार्क, फन पार्क, रिसॉर्ट मधील डायनींग सुविधा (आसनावर बसून खाने) अशी सर्व स्थाने १७ मार्च सायंकाळी ६ पासून ते ४ एप्रिलपर्यंत पूर्णतः बंद करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहेत.

Advertisement

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, डायनिंग व रेस्टॉरंट, हॉटेल, परमीट रूम, नाष्टा सेंटर, ढाबे आदी ठिकाणी मोठी गर्दी होत असल्याने हा निर्णय घेतला आहे. केवळ पार्सल सुविधा, टेक अवे किंवा घरपोच सुविधा सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Advertisement

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी संयुक्तपणे आदेश दिले आहेत की, वेरुळ, अजिंठ्यासह औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळे ४ एप्रिलपर्यंत बंद ठेवावे.

Advertisement

इतर नियम आणि अटी पुढीलप्रमाणे :

Loading...
Advertisement
  • अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी २० पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊ नये.
  • दुकाने सुरू ठेवण्यासाठी चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे.
  • विवाहसमारंभ, सभा, आंदोलने, शाळा, महाविद्याालये, विद्यापीठातील अध्ययन-अध्यापन बंद करण्यात आले आहे.

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply