Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी : गृहमंत्री बदलाबाबत राष्ट्रवादीने स्पष्ट केली ‘ही’ भूमिका..!

मुंबई :

Advertisement

पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या प्रकरणामुळे राज्याच्या गृह विभागाबद्दल संशयास्पद वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पूर्णविराम दिला आहे.

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत म्हंटले आहे की, देशमुख गृहमंत्री म्हणून व्यवस्थिक कारभार करत आहेत. त्यांच्या राजीनाम्याचा विषयच नाही. त्यामुळे यावरून कोणीही वावड्या उठवू नयेत. अँटिलियाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या, त्यामधील सचिन वाझे यांचा कथित सहभाग आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण यामुळे अशी चर्चा सुरू झाली होती.

Advertisement

वाझे यांच्या अटकेनंतर सीआययूमधील त्यांचे सहकारी रियाज काझी यांची एनआयएकडून चौकशी केली जात आहे. तर, भाजप आणि सर्वच विरोधकांकडून पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत ठाकरे सरकार कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांची बैठक होत असलाय्ने त्याकडे सर्व राज्याचे लक्ष लागलेले आहे.

Loading...
Advertisement

संपादन : संतोष वाघ    

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply