Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ नेत्याशी कनेक्शन असल्याचा NIA संशय; ‘असे’ आहेत सबळ पुरावे

मुंबई :

Advertisement

देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ (Antilia Case) स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारच्या घटना अवघ्या देशात खळबळ उडाली होती. या प्रकरणाच्या तपासाचे काम ज्यांच्याकडे होते ते तपास अधिकारी सचिन वाझे हेच आता या प्रकरणात अडकले आहेत. केंद्रीय तपास संस्था एनआयएने मुंबई पोलिसांचे एपीआय सचिन वाझे यांना अटक केली असून आतापर्यंतच्या तपासानुसार या कटाचे मुख्य सूत्रधार सचिन वाझे नसून एखादा राजकीय मोठा नेता असल्याचा एनआयएला संशय आहे. 

Advertisement

याप्रकरणी आता ठाण्यातील एका राजकीय नेत्याची चौकशी होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. यापूर्वी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सचिन वाझे आणि एका राजकीय नेत्याचे संबंध असल्याचा आरोप केला होता. 

Advertisement

NIAच्या चौकशीतही नेमकी हीच माहिती पुढे आल्याचे सांगितले जात आहे. ठाण्यातील हा नेता आणि सचिन वाझे यांचे आर्थिक संबंध होते. त्यामुळे आता याप्रकरणात आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Advertisement

अजून एक विशेष बाब म्हणजे सबळ पुरावा असलेल्या त्या कारची नंबर प्लेटचेही ठाण्याशी कनेक्शन आहे. या कटासाठी वापरण्यात आलेली इनोव्हा कार CIU युनिटच्या अधिकाऱ्यांनी वापरल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याची दोन सीसीटीव्ही फुटेज एनआयएला मिळाली आहेत. यापैकी पहिले फुटेज हे 13 मार्चचे आहे. यामध्ये ही पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार दुपारी 3.15 वाजता पोलीस आयुक्तालयातून बाहेर पडल्याचे दिसत आहे.

Advertisement

त्यानंतर 24 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजून 24 मिनिटांनी ही कार पोलीस मुख्यालयातून बाहेर पडली होती. त्यानंतर ही इनोव्हा ठाण्याला गेली. यादरम्यान इनोव्हा गाडीची नंबरप्लेट बदलण्यात आल्याचा संशय एनआयएला आहे.

Loading...
Advertisement

झेंवरील कारवाईसाठी सातत्याने आवाज उठविणा-या भाजपने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर मोठा दावा केला आहे. सचिन वाझेंनी चौकशीत कुठल्या शिवसेना नेत्यांची नाव घेतली, असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच मी तर यातला छोटासा हिस्सा आहे. यामध्ये काही शिवसेनेच्या नेत्यांचा सहभाग असल्याची कबुली वाझेंनी एनआयएकडे दिल्याचा दावा भाजपाने केला आहे. भाजपाच्या या दाव्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply