Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

विषय संपला… अखेर वाझेंनी खुलासा केला; NIA ला सापडला ‘हा’ सर्वात महत्वाचा पुरावा

मुंबई :

Advertisement

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके असलेली स्कॉर्पिओ सापडल्याच्या प्रकरणात वाझे याना अटक केली गेली आहे. या संशयित स्कॉर्पिओच्या मागे एका इनोव्हा गाडीत वाझे यांना दोन वेळा पाहिले गेले होते. ही इनोवा गुन्हा अन्वेषण विभागाची असून त्याचा वापर वाझे करत होते. एनआयने ने या संदर्भात दोन ड्रायव्हर आणि दोन अधिकाऱ्यांनाही ताब्यात घेतल्याचे समजते.

Advertisement

त्यांची ओळख पटली असून आता एनआयसाठी हा सर्वात महत्वाचा पुरावा मानला जात आहे. अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी उभी करण्यात या दोन्ही वाहनचालकांचा महत्त्वाचा सहभाग होता. त्यामुळे आता याप्रकरणातील आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Advertisement

तर दुसरीकडे सचिन वाझे यांनी एनआयएच्या चौकशीदरम्यान मुंबई पोलीस दलातील एका बड्या अधिकाऱ्याचे नाव घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता NIA या अधिकाऱ्याला चौकशीसाठी पाचारण करण्याची शक्यता आहे. मात्र, त्यासाठी काही कायदेशीर गोष्टींची पूर्तता करण्याची गरज असल्याचे या अधिकाऱ्याच्या चौकशीला आणखी वेळ लागण्याची शक्यता आहे.

Advertisement

मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना विशेष न्यायालयाने १४ ते २५ मार्च अशी १२ दिवसांसाठी एनआयए (राष्ट्रीय तपास संस्था) कोठडी मंजूर केली आहे. शनिवारी रात्री वाझे यांना एनआयएने अटक केली होती. त्यापूर्वी शुक्रवारी वाझे यांनी ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता मात्र न्यायालयाने त्या संदर्भातील सुनावणी १९ मार्च रोजी ठेवली आहे.

Advertisement

अंबानींच्या घराजवळ कार नेऊन ठेवण्यामागील उद्देश काय होता? भीती दाखवून त्यांना काय साध्य करायचे होते, याचा तपास सुरू आहे. केवळ स्वतःच्या हिमतीवर वाझे इतके मोठे धाडस करू शकत नाहीत, त्यांच्या पाठीशी वरिष्ठ अधिकारी व राजकीय वरदहस्त सल्याचा अधिकाऱ्यांना संशय आहे. ते कोणाच्या संपर्कात होते, याची माहिती घेतली जात आहे. याचदरम्यान आता महत्वाची माहिती एनआयएच्या हाती लागल्याचे सांगण्यात येत आहे.

Loading...
Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply