Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

योजना : पर्यटन संचालनालयाने आणली सुवर्णसंधी; पहा कोणाला आणि कसा होणार लाभ

पुणे :

Advertisement

महाराष्ट्र हे राकट, कणखर आणि दगडांच्या सुंदरतेचे राज्य आहे. या राज्यातील पर्यटनाला चालना मिळावी आणि त्याद्वारे रोजगार निर्मिती व्हावी यासाठी आता महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्यांनी एक खास टुरिस्ट गाइड योजना आणली आहे.

Advertisement

राज्याच्या विविध भागातील उमेदवारांना केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने तयार केलेल्या ऑनलाइन आयआयटीएफ टुरिजम फॅसिलिटेटर सर्टिफिकेशनअंतर्गत मोफत पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण देण्याची ही योजना आहे. याद्वारे पर्यटनाची आवड असणाऱ्या उमेदवारांना पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण देऊन राज्यात एक हजार टुरिस्ट गाइड तयार केले जातील.

Advertisement

http:/iitf.gov.in पोर्टलवर किंवा योगेश निरगुडे, पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुख्य कार्यालय, मुंबई यांच्याशी दूरध्वनी क्रमांक ०२२-६२९४८८१७ वर किंवा diot@maharashtratourism.gov.in या ई-मेलवर संपर्क साधून याबाबतची माहिती मिळेल.

Advertisement

योजनेत सहभागासाठी १८ ते ४० वयोगटातील उमेदवारांनी किमान बारावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या १ हजार उमेदवारांना पर्यटन संचालनालयामार्फत नोंदणी शुल्क परत करण्यात येणार आहे.

Advertisement

उत्तीर्ण उमेदवारांना महाराष्ट्र शासन प्रमाणित टुरिस्ट गाइड म्हणून प्रमाणपत्र देण्यात येऊन विविध पर्यटन स्थळांच्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळणार आहे. डिजिटल उपक्रमामुळे विद्यार्थी तथा उमेदवारांना त्यांच्या वेळेनुसार आणि सवडीनुसार हे ऑनलाइन शिक्षण घेण्याची संधी आहे.

Loading...
Advertisement

संपादन : माधुरी सचिन चोभे   

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply