Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

म्हणून विखे घराण्याची जिल्ह्याला गरज; पहा नेमके काय म्हटलेय डॉ. विखे यांनी

अहमदनगर :

Advertisement

दिवंगत माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांचा वारसा चालवताना भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी आता पुन्हा एकदा जिल्ह्यात विखे फॅक्टरची ताकद वाढवण्यासाठीचे प्रयत्न चालवले आहेत. त्यासाठी त्यांनी मेळावे घेतानाच विखे घराण्याची जिल्ह्याला गरज का आहे, हेही सांगितले आहे.

Advertisement

जामखेड येथील केशर लॉन्समध्ये भाजप कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी  जिल्हा बँकेचे संचालक नवनिर्वाचित अमोल राळेभात यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते जिल्हा बँकेचे माजी संचालक जगन्नाथ राळेभात, विठ्ठलराव राऊत, भाजप तालुकाध्यक्ष अजय काशीद, युवक अध्यक्ष शरद कार्ले, शहराध्यक्ष बिभीषण धनवडे, प्रा. अरुण वराट, नगरसेवक अमित चिंतामणी, ज्ञानेश्वर झेंडे, सुधीर राळेभात, रवींद्र सुरवसे, बापूराव ढवळे, सलीम बागवान, विनोद बेलेकर, सोमनाथ राळेभात, अॅड. प्रवीण सानप, भरत काकडे, किसनराव ढवळे, मकरंद काशिद आदी उपस्थित होते.

Advertisement

खासदार डॉ. विखे म्हणाले की, जिल्ह्यात मागील पन्नास वर्षांपासून विखे घराणे सामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे काम करीत आहे. सामान्य कार्यकर्त्यांना संघर्ष करण्यासाठीची साथही आम्ही देत आहोत. विखे घराणे राजकीयदृष्ट्या संपले, तर सामान्य लोकांना न्याय मिळणार नाही.

Advertisement

संपादन : सचिन पाटील  

Loading...
Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply