Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

प्रतिष्ठेपेक्षा मोदी सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे; पहा मुणगेकर यांनी नेमका काय दिला सल्ला

अहमदनगर :

Advertisement

सध्या दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन चालू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला महत्वाकांक्षी वाटणारे शेतकरी सुधारणा विधेयक त्यांना मान्य नाही. मात्र, केंद्र सरकार प्रतिष्ठेला जास्त महत्व देऊन त्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केला आहे.

Advertisement

त्यांनी म्हटले आहे की, नोटबंदी आणि चुकीच्या पद्धतीने जीएसटी लागू केल्याने देशाच्या आर्थिक प्रगतीचा वेग घसरत आहे. त्याचवेळी देशामध्ये करोना संकटात सरकारने ठोस आर्थिक मदत जाहीर न केल्याने बेरोजगारी वाढली आहे.

Advertisement

भाऊसाहेब थोरात साखर कारखाना विश्राम गृहावर पत्रकारांशी बोलताना डॉ. मुणगेकर म्हणाले की, मोदी सरकारने खात्यात १५ लाख जमा करु सांगितले आणि प्रत्यक्षात काहीही दिले नाही. त्यामुळे त्यांच्या कोणत्याही वचन आणि आश्वासनावर लोकांचा विश्वास राहिला नाही. परिणामी दिल्लीत लाखो शेतकऱ्यांचे ऊन-पाऊस-थंडीमध्ये आंदोलन सुरु आहे. 

Advertisement

त्यांनी पुढे म्हटले की, सरकारने पंतप्रधान आणि सरकारच्या प्रतिष्ठेपेक्षा शेतकऱ्यांना न्याय देणारे व अर्थव्यवस्थेमध्ये बॅलन्स सांभाळणारे कायदे करावेत. किमान हमीभावासाठी शेतकरी कायदा का मागत आहे. मोदी सरकारवर शेतकऱ्यांचा विश्वास नाही.

Loading...
Advertisement

संपादन : सचिन पाटील  

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply