Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

4 वेळा आमदार, माजी भाजप प्रदेशाध्यक्ष संभाजी पवार यांचे निधन; वाचा, कोणत्या बड्या नेत्याला पराभूत करून त्यांनी मिळवली होती ‘जायंट किलर’ उपाधी?

सांगली :

Advertisement

कुस्ती सुरू होऊन डोळ्याचे पाते लवते न लवते तोच प्रतिस्पर्धी मल्लाला धोबीपछाड देण्याची खासियत असणारे बिजली मल्ल आणि सांगलीचे माजी आमदार संभाजी पवार (वय ८०) यांचे (Sambhaji Pawar) मध्यरात्री निधन झाले. सांगली मतदारसंघातून ते चारवेळा आमदार म्हणून निवडून आले होते. (Former MLA Sambhaji Pawar passed away in Sangli.)

Advertisement

संभाजी पवार हे गेल्या काही वर्षांपासून पार्किन्सनच्या आजाराने त्रस्त होते. मागील वर्षी त्यांना उपचारासाठी मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली होती. परंतु, कोरोनालाही संभाजी पवार यांनी मात दिली होती.

Advertisement

‘वज्रदेही मल्ल’ हरी नाना पवार यांचे पुत्र म्हणून महाराष्ट्राला त्यांची ओळख झाली. मात्र एकाहून एक सरस कुस्त्या क्षणार्धात निकाली लावण्याची त्यांची खासीयत असल्यामुळे ‘बिजली मल्ल’ म्हणून ते प्रसिद्ध झाले. महाराष्ट्रासह कर्नाटक, पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये त्यांचा मोठा चाहता वर्ग होता. याच क्रीडा कामगिरीच्या जोरावर त्यांनी राजकीय क्षेत्रातही नशीब आजमावले.

Advertisement

स्व. वसंतराव दादा पाटील यांच्या हयातीत त्यांचे पुतणे सहकारमहर्षी विष्णु अण्णा पाटील यांचा सांगली मतदार संघातून विधानसभेला पराभव करुन संभाजी पवारांनी जायंट किलर अशी ख्याती मिळवली होती. शेतकऱ्यांच्या कामगारांच्या आणि सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर विधानसभा दणाणून सोडणाऱ्या संभाजी पवार यांना जनता दलाने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारीही सोपवली होती.

Loading...
Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply