Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

लॉकडाऊनचा सोने व्यवसायाला बसला ‘असा’ फटका; वाचा, किती आणि कधीपर्यंत कमी होणार दर

मुंबई :

Advertisement

मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. राज्यात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाची ही वाढणारी साखळी तोडण्यासाठी राज्यातील काही जिल्ह्यात कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे काही जिल्ह्यात लॉकडाऊनही करण्यात आला आहे. मात्र याचा फटका सोन्याच्या व्यवसायावर झालेला दिसून येत आहे.

Advertisement

अमरावती, नाशिक, अकोला यासारख्या जिल्ह्यानंतर जळगावातही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने  जनता कर्फ्यू लावला आहे. त्यामुळे तिथे १०० ते १२५ कोटींचा सोन्याचा व्यवसाय ठप्प पडला. एवढेच नाही तर उर्वरित महाराष्ट्रातही सोन्याच्या व्यवसायाला मोठा फटका बसला आहे.

Advertisement

ऑगस्टपासून आतापर्यंत जर आपण पाहिले तर सोन्याच्या किमतीत सुमारे 11000 रुपयांपेक्षा जास्त घट झालीय. आतापासून एप्रिल महिन्यापासून लग्नाचा मोसम सुरू होणार आहे. तर लग्नाच्या मोसमात आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे, कारण केवळ एका महिन्यात सोने सुमारे 2238 रुपयांनी स्वस्त झालेय.

Advertisement

येत्या काळात सोन्याच्या किमती आणखी घसरू शकतात. बाजार तज्ज्ञांच्या मतानुसार, येत्या काही दिवसांत सोने प्रति दहा ग्रॅम 42500 रुपयांवर येऊ शकते.

Loading...
Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply