Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

संघ-भाजपच्या ‘त्या’ कार्यामुळे देश अस्थिरतेकडे जाईल; मुणगेकरांनी व्यक्त केली भीती

अहमदनगर :

Advertisement

सध्या देशाला सर्वांना बरोबर घेऊन अर्थचक्र वेगवान करणारे सरकार आवश्यक असल्याचा पुनरुच्चार अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केला आहे. त्याचवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या धोरणामुळे देश अस्थिरतेकडे जाण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

Advertisement

भाऊसाहेब थोरात साखर कारखाना विश्राम गृहावर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, धर्माच्या आधारे समाजाचे विघटन करणाऱ्या शक्तींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनेअजिबात प्रोत्साहन देऊ नये. सरसंघचालक मोहन भागवत काशी-मथुरा वाद घालून जातीय तेढ निर्माण करत असल्याची बाब निंदनीय आहे. त्यामुळे देश अस्थिरतेकडे जाईल.

Advertisement

डॉ. मुणगेकर यांनी म्हटले की, ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदी जाहीर झाल्यापासून भारताची अर्थव्यवस्था दिशाहीन झाली. कॅश क्षणात काढून घेतल्याने अर्थव्यवस्थेमध्ये वितरण व व्यवहार करण्यासाठी कॅश शिल्लक राहिली नसल्याचा फटका अनेक क्षेत्र आणि देशाला बसला आहे. त्यानंतर घाईघाईने चुकीच्या पद्धतीने जीएसटीची अमंलबजावणी केल्याने देशाची प्रगती खुंटली आहे.

Advertisement

त्यांनी असाही आरोप केला की, एक कर लावण्यासाठी २००९ मध्ये यूपीए सरकारने विधेयक आणले त्यावेळी भाजपची ज्या राज्यात सरकारे होती, त्या सर्वांनी या विधेयकाला विरोध केला होता. त्यात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील गुजरात सरकार होते.

Loading...
Advertisement

संपादन : सचिन पाटील  

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply