Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक : नगर जिल्ह्यात कोरोना वाढला; वाचा, तालुकानिहाय रुग्णांची आकडेवारी

अहमदनगर :

Advertisement

राज्यासह नगरमधील जनतेसाठी चिंतेची बाब समोर येतेय. राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा एकदा उसळी घेतोय. तसेच नगरमध्येही कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांनी राज्य सरकारचे नियम गांभीर्याने घेण्याची गरज निर्माण झालीय. 

Advertisement

नगरमध्ये करोना बाधितांच्या संख्येत चिंताजनक वाढ आजही कायम आहे. जिल्ह्यात आज पुन्हा 449 नवे पॉझिटिव्ह सापडले असून, आज केवळ 325 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.

Advertisement

दरम्यान, आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 77 हजार 30 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 95.77 टक्के इतके झाले आहे. आज वाढलेल्या नव्या रुग्णांमुळे झाल्याने उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 2 हजार 227 इतकी झाली आहे.

Advertisement

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 94, अकोले 05, कोपरगाव 28, नगर ग्रामीण 08, नेवासा 09, पारनेर 10, पाथर्डी 04, राहाता 42, राहुरी 09, संगमनेर 32, शेवगाव 08, श्रीगोंदा 03, श्रीरामपूर 13 आणि इतर जिल्हा 02 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज 23 जण बाधित आढळुन आले. मनपा 10, पारनेर 01, पाथर्डी 01, राहाता 05, शेवगाव 01, श्रीगोंदा 01, श्रीरामपूर 01, कॅन्टोन्मेंट 01, इतर जिल्हा 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.

Loading...
Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply