Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

घोटाळेबाजांचा बादशहाच की; फ़क़्त १०० मीटर जमिनीसाठी ४९६ हिस्सेदार आणि २२ कोटींची भरपाई..!

दिल्ली :

Advertisement

सरकारी अधिकारी आपल्या घरातला असला की तो गुणी असतो, आणि आपल्या घरातला नसला की त्याला अवगुणी म्हणण्याची प्रथा भारतभरात आहे. त्यालाच आणखी एक खास उदाहरणाची जोड देण्याचे काम उत्तरप्रदेश राज्यात घडले आहे. इथे फ़क़्त १०० मीटर जमिनीसाठी तब्बल ४९६ हिस्सेदार पुढे आल्याने त्यांना तब्बल २२ कोटी रुपये नुकसान-भरपाईची तजवीज करण्याचा महान घोटाळा उघडकीस आला आहे.

Advertisement

यूपीच्या दादरीपासून सुरू होणार्‍या रेल्वे बोर्डाच्या दिल्ली फ्रेट कॉरिडॉरच्या भूसंपादनाच्या प्रकरणातील घोटाळ्यात स्थानिक एसडीएम अधिकारी आणि इतरांच्या भूमिकेचीही चौकशी केली जात आहे. सादर जमीनीच्या तुकड्यांमध्ये एसडीएमचे नातेवाईक, कर्मचारी, संगणक ऑपरेटर, पटवारी आदींची नावेही समोर आली आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

Advertisement

याप्रकरणी एसडीएम यांना २४ मार्चपर्यंत रजेवर पाठविण्यात आले आहे. त्यांच्यावर तपासणीनंतर कारवाई होऊ शकते. येथे फ़क़्त मीटर जागेसाठी सुमारे ४९६ लोकांना मालक बनवल्याची माहिती मिळाली आहे. त्यात अधिकाऱ्यांचे नातेवाईक आणि कर्मचारी यांचाच भरणा आहे.

Advertisement

असा झालाय घोटाळा..!

Advertisement

असवती, मेधापूर, लाडपूर, जतौला, तारतारपूर आणि पृथ्वला या गावांची जमीन यात संपादित केली जात आहे. कॉरिडॉरच्या नकाशानुसार १०० मीटर लांबीच्या दोन पट्ट्यांकरिता जमीन देखील संपादित केली गेली आहे. या १०० मीटर जागेमध्ये ४९६ भागधारक असून त्यांना २२ कोटी रुपये इतकी भरपाई देण्यासाठीची कार्यवाही होणार होती.

Loading...
Advertisement

हा मोठा आकडा पाहून अनेकांना संशय आल्याने आता याप्रकरणी चौकशीला सुरुवात झालेली आहे. सरकारी जमीन अधिग्रहण म्हणजे घोटाळ्याचे कुरण. मात्र, इतक्या छोट्या जमिनीवर इतके भरमसाठ हिस्सेदार दाखवून मोठी रक्कम पळवण्याचा हा घोटाळा म्हणजे घोटाळेबाजांचा बादशहा असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply