Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

चीनच्या अडचणीत वाढ; भारताला मिळाले बळ, पहा नेमकी कोणती घडामोड घडली ते

दिल्ली :

Advertisement

जगभरात मुजोरी दाखवून एकांडा पडलेला चीन आता आणखी अडचणीत सापडला आहे. कारण, भारताच्या मदतीला आता अमेरिकेसह जपान आणि ऑस्ट्रेलिया असे दिग्गज देशही आलेले आहेत.

Advertisement

क्वाड देशांच्या सर्वोच्च नेत्यांच्या पहिल्या शिखर परिषदेनंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान योशीहिदा सुगा यांनी वॉशिंग्टन पोस्टमध्ये एक लेख लिहिला आहे. या लेखात या चार नेत्यांनी चीन-भारत-प्रशांत प्रदेश स्वतंत्र व मुक्त ठेवण्याच्या बांधिलकीचा पुनरुच्चार केला आहे.

Advertisement

चीनला कडक संदेश देताना चारही देशांनी समान ध्येये असलेल्या देशांसह एकत्रितपणे काम करण्याची शपथ घेतली आहे. क्वाड हा ग्रुप हा संकटकाळात जन्मला होता. 2007 मध्ये मुत्सद्दी संभाषण होऊन पुढे 2017 मध्ये त्याचा जन्म झाला. या चार नेत्यांनी लिहिले आहे की, इंडो-पॅसिफिक प्रदेशातील परस्पर हितसंबंध राखून विकासाला चालना देण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.

Advertisement

लेखात चीनला स्पष्ट संदेश दिला आहे की, चीनचे दादागिरीचे दिवस संपत आले आहेत. तैवानपासून लडाखपर्यंतच्या भागात चीन चिथावणीखोर कारवाई करीत आहे. यामुळे संपूर्ण इंडो-पॅसिफिक प्रदेशात तणाव वाढला आहे. इतकेच नाही तर दक्षिण चीन समुद्रावर कब्जा करण्याचा प्रयत्न केल्यामुळे चीन अनेक दक्षिण-पूर्व आशियाई देशांमध्ये वादामध्ये अडकला आहे.

Advertisement

चीननेही या चार देशांच्या एकत्रित प्रयत्नांना गांभीर्याने घेतले आहे. त्यांनी क्वाड देशांच्या बैठकीवर टीका केली आहे. एकूणच या चार देशांनी एकत्रित येऊन चीनला मोठा झटका दिल्याचा संदेश जगभरात पोहोचला आहे.

Loading...
Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply