Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

नीता अंबानीही होणार प्राध्यापक; पहा ‘कोणत्या’ विद्यापीठात करणार ज्ञानदान

मुंबई :

Advertisement

सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची पत्नी आणि उद्योग जगतामध्ये आदराने ज्यांचे नाव घेतले जाते त्या नीता अंबानी या आता आपल्या नव्या कर्तव्यासाठी सिद्ध होत आहेत. त्यांना प्राध्यापक म्हणून ज्ञानदानाची संधी बनारस हिंदू विद्यापीठात (BHU) मिळणार आहे.

Advertisement

वाराणसी शहर आणि परिसर यासह पूर्व उत्तरप्रदेशातील महिलांना सशक्त व समृद्ध करण्यासाठी बीएचयूने एक विशेष प्रोजेक्ट तयार केला आहे. त्यात नीता अंबानी यांना व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून शिकवण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. सामाजिक विज्ञान संकाय यामध्ये स्थापन केलेल्या महिला अभ्यास आणि विकास केंद्राने त्यांना ही ऑफर दिली आहे.

Advertisement

रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी या विद्यापीठाच्या केंद्राच्या प्रस्तावाशी सहमत झाल्यास, लवकरच त्या बीएचयूमध्ये शिकवताना दिसतील. दि. 12 मार्च रोजी विद्याशाखा प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर हा प्रस्ताव देण्यात आला आहे. नीता अंबानी यांच्या मौखिक होकारानंतर हा प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे.

Advertisement

नीता अंबानी यांच्या व्यतिरिक्त समाजातील इतर यशस्वी व उद्योजक महिलांना केंद्राशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. नीता अंबानी या प्राध्यापक झाल्याने केवळ वाराणसीच नव्हे तर संपूर्ण पूर्वांचलच्या विकासाला फायदा होईल. नीता अंबानी यांनी २०१० साली रिलायन्स फाऊंडेशनची स्थापना केली आहे. त्याद्वारे महिलांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आपल्या भागात काम होण्यासाठी विद्यापीठाने हे पाउल उचलले आहे.

Loading...
Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply