Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. काँग्रेस प्रवक्त्यांनी बातमी शेअर करीत म्हटले सगळ्यांना ‘अडाणी’..!

मुंबई :

Advertisement

सुप्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांची घोडदौड अवघ्या जगाला लाजवणारी आहे. मागील काही वर्षांमध्ये अदानी ग्रुप आणि गौतम अदानी यांची वाढलेली संपत्ती ही अनेक भारतीयांना सुखद धक्का देणारी आहे. या उद्योगपतीने संपत्ती वाढीमध्ये जगातील अनेकांना चीत केले आहे. त्यावर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विटर पोस्ट शेअर केली आहे.

Advertisement

अदानी यांची घोडदौड ही अनेकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेल्या मैत्रीचा परिपाक वाटत आहे. काँग्रेस आणि काही राजकीय पक्षांनी याबाबत वेळोवेळी भाष्य केले आहे. त्याच धाग्याने सावंत यांनी गौतम अदानी यांची बातमी शेअर करून ‘हुशार अदानी….. बाकी अडाणी’ म्हटले आहे.

Advertisement

त्यावर आता नेहमीप्रमाणे उलटसुलट उत्तर-प्रत्युत्तर सुरू झालेले आहेत. प्रसाद करकरे यांनी सावंत यांना प्रत्युत्तर दिले आहे की, अडानी असो की अंबानी, हजारो लाखो लोकांना रोजगार देऊन श्रीमंत झाले. नेहरु-गांधी-वाड्रा कुटुंबिय काहीच न करता इतके अरबोपती कसे झाले?

Advertisement

तर, समीर कुलकर्णी यांनी लिहिले आहे की, जनता शहाणी काँग्रेसी अडाणी. एकूणच अदानी ग्रुपच्या वाढीवर काँग्रेस पक्षाचा आक्षेप अजूनही कायम आहे. तर, भाजप समर्थकांना अदानी यांची वाढ सुखद धक्का देणारी असल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झालेले आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Loading...
Advertisement

Sachin Sawant सचिन सावंत on Twitter: “हुशार अदानी….. बाकी अडाणी https://t.co/0IfaL1CPwh” / Twitter

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply