Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

ब्लॉग : MPSC मोठ्या प्रमाणावर रोजगार तयार करते की बेरोजगार..!

सध्या एमपीएससीच्या परीक्षेचा मुद्दा खूप चर्चेत आहे. अगदी महाविकास आघाडी सरकारची पाळेमुळे हलवण्याचे काम या मुद्द्याने केले आहे. परीक्षा पुढे ढकलण्याच्या मुद्द्यावर मंत्रालय आणि प्रशासकीय पातळीवर सुरू असलेल्या खेळामुळे असे झाले. त्याचेवेळी नोकऱ्या कमी होत असल्याने यावर नेमके काय करावे हा सामाजिक, राजकीय आणि सरकारच्या पातळीवरील महत्वाचा मुद्दा अजूनही अनेकांच्या पचनी पडलेला नाही. त्यावर डॉ. प्रफुल गाडगे (संस्थापक, बायोमि टेक्नोलॉजीज, अहमदनगर) यांनी आपली भूमिका विषद केली आहे. ती आम्ही जशीच्या तशी प्रसिद्ध करीत आहोत.

Advertisement

सध्या महाराष्ट्रात पदवीधरांसाठी, युवकांसाठी रोजगारासाठी एकच पर्याय आहे असं दिसतंय तो म्हणजे राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा म्हणजे MPSC. बहुदा इतर सगळे पर्याय संपलेले असावेत अशी एकंदरीत परिस्थिती युवक तयार करताना दिसत आहेत..!

Advertisement

परवा औरंगाबादेत असताना एका मित्राला या जिवाभावाच्या (की जीवघेण्या) परिक्षेने मानसिक धक्का दिल्याचे ऐकले. कारण हे होते की, तो गेल्या तीन वर्षांपासून एमपीएससीची तयारी करत आहे आणि त्यातच परीक्षा पुढे ढकलण्याची बातमी आली. त्याला तो धक्का इतका बसला होता की त्याच्या तोंडातून तिथून पुढे शब्दच फुटत नव्हते. त्याचे बोलणे पूर्णपणे बंद झाले होते. त्यामुळे घरच्यांनी त्याच्यावर नुकतेचं मानसोपचार तज्ञांकडून उपचार सुरू केले आहेत. हा मित्र नुसता पदवीधर नसून एका विषयांत पीएचडी धारकही आहे.

Advertisement

हे सगळं रामायण घडल्यानंतर थोडक्यात काही गोष्टींचा आढावा घेतला असता असे समजले की २०१७, २०१८, २०१९ या वर्षात सरासरी अंदाजे पाच ते सहा हजार पदे भरली गेली. या पदांसाठी सरासरी अंदाजे पंधरा लाख एवढ्यावर उमेदवार होते आणि यातील यशस्वी विद्यार्थ्यांची सरासरी ही अंदाजे अगदी कमी म्हणजे फक्त ०.२५% एवढी होती. म्हणजेच एमपीएससी ही ‘प्रचंड मोठ्या प्रमाणावर संपूर्ण महाराष्ट्रात रोजगार पुरवते’ (की बेरोजगार तयार करते). यात विद्यार्थी इतके आकंठ बुडतात की इतर कुठलाही पर्याय विद्यार्थ्यांच्या या एककल्ली किंवा एकलकोंडी अभ्यासाच्या पद्धतीमुळे पूर्णपणे बंद होतात.

Advertisement

सदर प्रसंग व बोलणे उपहासात्मक झाले. परंतु यातील गांभीर्य वाचणाऱ्या मंडळींच्या लक्षात यावे ही अपेक्षा! सध्या व्यवसायात आणि नोकरीत प्रचंड संधी उपलब्ध आहेत. मी स्वतः दोनदा नोकरी सोडली आहे. पहिल्यांदा पाटबंधारे विभागातील शासकीय नोकरी आणि दुसऱ्यांदा एका नामांकित शिक्षण संस्थेमधील सहाय्यक प्राध्यापकाची नोकरी.

Advertisement

ज्या क्षेत्रात शिक्षण घेतले त्याच चालू केलेल्या क्षेत्रातील व्यवसायामध्ये स्थैर्य आणि प्रतिष्ठा दोन्हीपण मिळाले आहे. माझ्या कौटुंबिक गरजा व्यवस्थितरीत्या पूर्ण होत आहेत. माझ्यासारखे इतरही अनेक तरुण आहेत ज्यांनी नोकरीच्या नादी न लागता, आर्थिक ताकद नसताना ही व्यवसायात उंच झेप घेतलेली आहे. माझी विनंती आहे की, अशा तरुणांनी समोर येऊन आपल्या बांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी पुढाकार घ्यावा!

Advertisement

कृषी क्षेत्रात व्यवसायाच्या प्रचंड मोठ्या संधी दार ठोठावत आहे. कृषी क्षेत्रातील सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांचा ओढा हा सध्या स्पर्धा परीक्षांच्याकडेचं जास्त दिसत आहे. यातील उपलब्ध जागा आणि परीक्षार्थी यांच्या आकडेवारी लक्षात घेतली असता खूपच कमी संधी स्पर्धा परीक्षांत उपलब्ध आहेत. प्रत्यक्षात कृषी क्षेत्रात नवीन-नवीन निर्माण होत असलेल्या संधी, शेतमालाचे प्रोसेसिंग, वाहतूक, शेतातील कचऱ्याचे वेस्ट टू व्हॅल्यू कन्वर्जन, ऍग्री क्लिनिक या व्यतिरिक्त प्रत्यक्ष शेतात आणि संबंधित व्यवसायांमध्ये तांत्रिक मनुष्यबळाची गरज मोठ्या प्रमाणावर आहे.

Loading...
Advertisement

‘बायोमि टेक्नॉलॉजी’मार्फत मोठ्या प्रमाणावर जैविक सेंद्रिय खते, कीटकनाशके, फुड प्रोसेसिंग, वेस्ट मॅनेजमेंट, तसेच इतर जैवतंत्रज्ञान विषयक प्रोजेक्ट विविध कंपन्यांसाठी- उद्योजकांसाठी निर्माण करून दिले जातात, परंतु यामध्ये आम्हाला कुशल मनुष्यबळाची समस्या खूप मोठ्या प्रमाणावर भेडसावते आहे. एकूणच स्पर्धा परीक्षांव्यतिरिक्त नोकरी आणि व्यवसायाचा प्रचंड संधी उपलब्ध आहेत.

Advertisement

कृषिमध्ये विद्यावाचस्पती असलेल्या डॉ अंकुश जालिंदर चोरमुले यांनी स्पर्धा परीक्षा आणि त्याचे भान जागरूक ठेवण्याचे मत व्यक्त केले. रितेश उषाताई भाऊसाहेब पोपळघट या युवा उद्योजकाने म्हटल्याप्रमाणे स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासोबत ‘प्लॅन बी’ आवश्यक आहे. हा सर्व विचार करून तरुणांनी आता दिशा शोधणे गरजेचे आहे.

Advertisement

FACEBOOK LINK : http://www.facebook.com/drprafullgadge

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply