Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

63 एन्काऊंटर नंतर सस्पेंड, अखेर राजीनामा आणि मग शिवसेनेत प्रवेश…; वाचा, सचिन वाझेंचा संपूर्ण 7/12

मुंबई :

Advertisement

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार लावल्या प्रकरणी एनआयएने शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास एन्काऊंटर स्पेशालिस्य सचिन वाझेंना अटक करण्यात आली आहे. या अटकेमुळे मुंबई पोलिस दलात खळबळ उडाली असून आणखी काही अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (NIA will arrest three more people after Sachin Vaze’s Arrest.)

Advertisement

वाझे यांची एकूण कारकीर्द वादग्रस्त असल्याच्या चर्चा लोकांमध्ये आहेत. जाणून घ्या काय होते वाझे आणि कसे बनले हिरो :-

Advertisement
  • सचिन वाझे 1990 मध्ये सब इन्स्पेक्टर म्हणून मुंबई पोलिसात ज्वाईन झाले होते. त्यांनी आतापर्यंत 63 एन्काऊंटर केले आहेत.
  • नुकतंच Republic TV चे संपादक अर्णब गोस्वामी यांना त्यांनी घरातून अटक केली होती. गोस्वामींच्या अटकेसाठी तयार केलेल्या टीमचं नेतृत्व सचिन वाझे यांनी केलं होतं.
  • सचिन वाझे जवळपास 13 वर्षांनंतर 6 जून, 2020 रोजी पुन्हा पोलिस फोर्समध्ये परतले आहेत. त्यांनी 2007 मध्ये मुंबई पोलिसातून राजीनामा दिला होता.
  • सचिन वाझे यांनी छोटा राजन आणि दाऊद इब्राहिमच्या अनेक गुंडांचा एन्काऊंटर केला आहे. एनकाउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा त्यांचे बॉस होते.
  • सचिन वाझेंसह 14 पोलिस कर्मचाऱ्यांना 2004 मध्ये सस्पेंड करण्यात आलं होतं. या सर्वांवर 2002 घाटकोपर ब्लास्टचा आरोपी ख्वाजा यूनिसच्या कस्टोडियल डेथचा आरोप होता.
  • सस्पेंशन काळ संपल्यानंतर नाराज होत त्यांनी 2007 मध्ये पोलिस फोर्सचा राजीनामा दिला.
  • 30 नोव्हेंबर 2007 रोजी त्यांनी मुंबई पोलिसांची नोकरी सोडल्यानंतर 2008 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता.
  • 2020 मध्ये कोरोना महामारीच्या काळात सचिन वाझे पुन्हा पोलिस फोर्समध्ये परतले.
  • नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर त्या वेळी त्यांनी चीन इथल्या काही कंपन्यांसोबत करार करून चायनीज वस्तू इम्पोर्ट-एक्सपोर्टचा व्यवसाय सुरू केला आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. त्यांचा हा व्यवसाय अद्यापही सुरू असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे.

लहानपणापासूनच पोलीस दलात रुजू होण्याची सचिन वाझे यांची इच्छा होती. पोलीस दलात रुजू झाल्यापासून त्यांनी कोल्हापूरमधील कुटुंबीयांसोबत आपलं नातं तोडून टाकलं. त्यांच्या आईचं काही वर्षापूर्वी निधन झाल्यानंतर सचिन वाझेंना ही दुःखद वार्ता कळवण्यात आली त्यावेळी त्यांनी कोल्हापुरात येण्यास नकार दिला होता. ‘मला वेळ नाही’ असा निरोप देऊन त्यांनी आईचे अंत्यसंस्कार लहान भावाला करण्यास सांगितले होते.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Loading...
Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply