Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

सचिन वाझेंच्या घराला आहे २ आठवड्यांपासून कुलूप; कुटुंबीयांबाबत ‘तो’ धक्कादायक प्रकार समोर

मुंबई :

Advertisement

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार लावल्या प्रकरणी एनआयएने शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास एन्काऊंटर स्पेशालिस्य सचिन वाझेंना अटक करण्यात आली आहे. या अटकेमुळे मुंबई पोलिस दलात खळबळ उडाली असून आणखी काही अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (NIA will arrest three more people after Sachin Vaze’s Arrest.)

Advertisement

अशातच आता वाझे यांच्या कुटुंबाबाबत एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. वाझे यांचे कुटुंबीय मागील 10 ते 12 दिवसांपासून घरी नसल्याची बाब समोर आली आहे. वाझे राहत असलेल्या ठाण्यातील साकेत सोसायटीच्या सुरक्षारक्षकाने सदर माहिती ‘टीव्ही 9’ या मराठी वृत्तवाहिनीला दिली आहे. 

Advertisement

कुठे राहतात वाझे आणि काय आहे हे नवे प्रकरण :-

Advertisement

सचिन वाझे हे ठाण्याच्या साकेत कॉम्प्लेक्स परिसरात बी 6 क्रमांकाच्या इमारतीत वास्तव्याला आहेत.  शनिवारी रात्री त्यांना अटक झाली असून यानंतर ‘एनआयए’कडून वाझे यांच्या घराची झडती घेतली जाण्याची शक्यता आहे. वाझे यांचे कुटुंबीय मागील 10 ते 12 दिवसांपासून घरी नसल्याचं सिक्युरिटीने सांगितलं. तसंच त्यांच्या घराला कुलूप आहे, अशी माहिती मिळाली आहे.

Advertisement

अंबानींच्या घराबाहेर लावलेल्या स्कॉर्पिओच्या कटात थेट वाझेंचा सहभाग असल्याचा संशय आल्याने वाझेंना अटक करण्यात आली आहे. या कटात आणखी 5-7 जणांचा समावेश आहे. मुंबई पोलिस दलातील आणखी काही अधिकाऱ्यांची चौकशी होऊ शकते. ठाणे येथून आणखी ३ जणांच्या अटकेची शक्यता असल्याचे एनआयएमधील सुत्रांनी सांगितले आहे.

Loading...
Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply