Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ ठिकाणी टाटा बनवणार इलेक्ट्रिक कार; १०० कोटीची गुंतवणूक आणि रोजगारही मिळणार..!

नागपूर :

Advertisement

मिहान प्रकल्प याचे नाव किती वर्षे ऐकतोय ना आपण? परंतु, तो प्रकल्प काही पूर्ण होईना आणि परिणामी नागपूरकरांना रोजगाराची संधी काही येईना. मात्र, आता टाटा मोटर्स ही कंपनी १०० कोटी रुपये या ठिकाणी लावून इलेक्ट्रिक कार बनवणार आहे.

Advertisement

ही माहिती टाटांनी नाही, मात्र केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. फॉर्च्युन फाउंडेशनतर्फे सातव्या यूथ एम्पॉवरमेंट समीट २०२१ चे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झाल्यावर त्यांनी ही महत्वाची माहिती दिली. माजी आमदार प्रा. अनिल सोले, महापौर दयाशंकर तिवारी, माजी आमदार सुधाकर देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.

Advertisement

गडकरी म्हणाले की, रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात १०० कोटींचा इलेक्ट्रिक वाहनांचा प्रकल्प टाटा ग्रुपतर्फे सुरू केला जाणार आहे. इथेच इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळेल. या प्रकल्पातून हजारो तरुणांना रोजगार मिळेल. नागपूरच्या विकासाचा सर्वांगीण विचार करूनच असे ठोस आणि महत्वाचे प्रकल्प आणण्याचे प्रयत्न होत आहेत.

Advertisement

मेट्रोमुळे १० हजार तर, मिहान प्रकल्पात सुमारे ५६ हजार रोजगार उपलब्ध झाले आहेत. ब्रॉडगेज मेट्रोच्या माध्यमातूनही आणखी रोजगार उपलब्ध होणार आहे. खादी ग्रामोद्योग, एमएसएमईच्या योजनांद्वारे रोजगार निर्मिती शक्य आहे. यासह हस्तकला, हातमाग उद्योगांच्या माध्यमातून स्वयंरोजगार कसा उपलब्ध होईल, यासाठीही फॉर्च्यून फाउंडेशनने आता पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा गडकरी यांनी व्यक्त केली आहे.

Loading...
Advertisement

संपादन : संतोष शिंदे  

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply