Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

शू.. राज ठाकरेंचा मनसे अॅक्टिव्ह मोडवर; पहा नेमके काय काम सुरू केलेय पक्षाने

पुणे :

Advertisement

लोकप्रिय वक्ते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पुन्हा एकदा राजकीयदृष्ट्या दणक्यात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. कारण, त्यांनी पक्षाच्या डिजिटल नोंदणीला सुरुवात केली आहे.

Advertisement

मुंबईसह पुणे, नागपूर येथील महापालिका निवडणुका आणि जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुका पुढील आठ महिन्यात होत आहेत. या कालावधीत पक्षाला पुन्हा सक्रीय करून दखलपात्र मतदान मिळवणे आणि कुठेतरी सत्तेत जागा शोधणे ही मनसे या राजकीय पक्षाची गरज बनली आहे. दरम्यान, राज्यात महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यामध्ये आपली स्पेस निर्माण करण्यासाठी राज ठाकरे यांचा पक्ष सरसावला आहे.

Advertisement

आजपासून म्हणजे 14 मार्च या दिवसापासून त्यांनी मनसेच्या सभासद नोंदणीला दणक्यात सुरुवात झाली आहे. त्यांनी यासाठी अनेक नामांकित व बड्या वृत्तपत्रात जाहिराती दिल्या आहेत. त्यावर क्यूआर कोड देऊन डिजिटल पद्धतीने नोंदणी करण्याची सोपी पद्धत देण्यात आलेली आहे.

Advertisement

तसेच ९९२०४५ ६७८९ या मोबाईल नंबरवर मिस्ड कॉल देऊन किंवा mnsnondani.in या वेबसाईटवार जाऊनही सभासद होण्याची संधी देण्यात आलेली आहे. त्यासाठी २-३ मिनिटात ही कार्यवाही पूर्ण करणारी पद्धत पक्षाने आणली आहे. आपण त्यावर जाऊन मोबाईल नंबर टाकला की त्यावर एक ओटीपी पाठवला जातो. तो ओटीपी टाकून आपले नाव, पत्ता आणि फोटो अपलोड केला की लगोलग आपणास एक डिजिटल ओळखपत्र तयार करून मिळते.

Advertisement

डिजिटल ओळखपत्रावर राज ठाकरे यांची स्वाक्षरी आहे. तसेच त्यावर तुमचे नाव, फोटो आणि सभासद नोंदणी नंबर दिलेला असतो. हे ओळखपत्र पीडीएफमध्ये लगेचच डाऊनलोड करता येते. अशा पद्धतीने काही मिनिटात आपण पक्षाचे सक्रीय सभासद म्हणून ओळखपत्र प्राप्त करून घेऊ शकता.

Loading...
Advertisement

या नोंदणीमुळे पक्षाने आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका लढवण्यासाठी तयारी केल्याचा स्पष्ट संदेश महाराष्ट्रात पोहोचला आहे. दमदार वक्ते असलेल्या राज ठाकरे यांच्या राजकीय सभांना जोरदार गर्दी होते. मात्र, त्यातून मतदानाचा टक्का आतापर्यंत काही तितका वाढू शकलेला नाही. त्यामुळे आताचे हे पक्षाचे अभियान कितपत यशस्वी ठरते ते आठ-दहा महिन्यांनी निकाल समोर आल्यावरच स्पष्ट होईल.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply