Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ स्कार्पिओचा आधीही झाला होता वापर; थेट आहे अर्नबशी कनेक्शन

मुंबई :

Advertisement

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Waze) यांना अटक केल्यानंतर आता याप्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. NIA ने शनिवारी सचिन वाझे यांनी तब्बल 13 तास कसून चौकशी केली होती. या चौकशीत NIAच्या हाती काहीतरी सबळ पुरावा लागल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. (NIA arrested API Sachin Waze in Mukesh Ambani explosive car case)

Advertisement

सचिन वाझेंनीच अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी प्लॉट केली, असा आरोप NIA नी केला आहे. (Sachin Waze plotted a explosives car outside Ambani’s house NIA Allegation)

Advertisement

साहाय्यक निरीक्षक सचिन वाझे यांच्याकडील चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येत आहे. हिरेन यांच्या महिंद्रा स्कॉर्पिओचा वापर सुमारे चार महिन्यांपूर्वी अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवेळी (४ नोव्हेंबर) करण्यात आला होता.

Advertisement

२५ फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ जिलेटिनच्या कांड्या असलेली कार सापडली होती. ती तेव्हा वाझे यांच्याकडे होती. याच गाडीतून अर्णब गोस्वामी यांच्या घरी ते गेले होते. मात्र त्या वेळी या स्कॉर्पिओला अन्य नंबर प्लेट लावली होती, असे सूत्रांकडून सांगण्यात येते.

Advertisement

याप्रकरणी आता ठाण्यातील एका राजकीय नेत्याची चौकशी होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. यापूर्वी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सचिन वाझे आणि एका राजकीय नेत्याचे संबंध असल्याचा आरोप केला होता. 

Advertisement

या संपूर्ण कटात सचिन वाझे यांच्यासह पाच ते सात जणांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आता NIA कडून मुंबई पोलीस दलातील बड्या अधिकाऱ्यांची चौकशी होऊ शकते. ठाण्यातून आणखी काही जणांना लवकरच ताब्यात घेतले जाऊ शकते. यामध्ये इनोव्हा गाडीतून जाणारे दोन्ही चालक आणि एका व्यावसायिकाचा समावेश असल्याचे सांगितले जाते.

Loading...
Advertisement

NIAच्या चौकशीतही नेमकी हीच माहिती पुढे आल्याचे सांगितले जात आहे. ठाण्यातील हा नेता आणि सचिन वाझे यांचे आर्थिक संबंध होते. त्यामुळे आता याप्रकरणात आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply