Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

हिरेन प्रकरणाला नवा ट्वीस्ट; आता कोण बोलतेय खरे आणि कोण खोटे?

मुंबई :

Advertisement

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणामुळे अडचणीत आलेल्या सचिन वाझे यांचा अटकपूर्व जामिन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशातच या प्रकरणाला एक मोठा ट्वीस्ट देणारी बातमी समोर आली आहे.  

Advertisement

मनसुख हिरेन आणि कुटुंबीयांचे वकील गिरी यांनी दिलेल्या माहितीमुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. गिरी यांनी एक  धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे.

Advertisement

दर एक दोन तासांनी कुठून ना कुठून पोलीस यायचे, प्रश्नांची सरबत्ती केली जायची. कुटुंबीयांना झोपू दिले जात नसे. प्रसारमाध्यमांकडूनही विचारणा व्हायची. त्यामुळे मनसुख हिरेन आणि त्यांचे कुटुंबीय त्रस्त होते. मात्र सचिन वाझेंबाबत त्यांनी मला काही सांगितले नव्हते. उलट सचिन वाझे हे आपले मित्र आहेत. त्यांना माझी मदत करायची आहे, असे त्यांनी मला सांगितले होते, असा दावा हिरेन यांचे वकील गिरी यांनी केला.

Advertisement

पुढे त्यांनी सांगितले की, मनसुख हिरेन यांची गाडी १७ फेब्रुवारीला चोरीला गेली होती. १८ तारखेला त्यांनी विक्रोळी पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. त्यानंतर ही गाडी अंबानींच्या घराशेजारी स्फोटकांनी भरलेल्या अवस्थेत सापडली होती. त्यानंतर मनसुख हिरेन यांच्यामागे पोलीस आणि माध्यमांचा ससेमिरा लागला होता. त्यामुळे हिरेन यांनी माझ्याकडून याबाबत कायदेशीर सल्लाही घेतला होता.

Advertisement

आता यावर हिरेन यांचे कुटुंबीय काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान दुसऱ्या बाजूला वाझे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसत आहे. मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी वादग्रस्त एपीआय सचिन वाझे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज ठाणे सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.

Loading...
Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply