Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

सोने खरेदीची सुवर्णसंधी : मार्चमध्ये सोन्याच्या किमतीत 2238 रुपयांची घट; ‘या’ कालावधीत सोने आणखी घसरणार

मुंबई :

Advertisement

गेल्या वर्षभरापासून सोन्याच्या दरात सातत्याने तेजी होती. लोक सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूकीच्या दृष्टीने पाहत होते. लॉकडाउनच्या काळात वाढलेले दर अजूनही कमी झालेले नव्हते.

Advertisement

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प नुकताच सादर केला. यात केंद्र सरकारने सोने आणि चांदीवरील कस्टम ड्यूटी कमी केली आहे. याचाच थेट परिणाम सोन्याच्या आणि चांदीच्या दरावर झाला असून सोन्याचांदीच्या दरात घसरण झाली आहे.

Advertisement

ऑगस्टपासून आतापर्यंत जर आपण पाहिले तर सोन्याच्या किमतीत सुमारे 11000 रुपयांपेक्षा जास्त घट झालीय. आतापासून एप्रिल महिन्यापासून लग्नाचा मोसम सुरू होणार आहे. तर लग्नाच्या मोसमात आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे, कारण केवळ एका महिन्यात सोने सुमारे 2238 रुपयांनी स्वस्त झालेय.

Advertisement

येत्या काळात सोन्याच्या किमती आणखी घसरू शकतात. बाजार तज्ज्ञांच्या मतानुसार, येत्या काही दिवसांत सोने प्रति दहा ग्रॅम 42500 रुपयांवर येऊ शकते. गेल्या एका आठवड्यात सोन्याच्या स्पॉट प्राईसमध्ये सुमारे 183 रुपयांची घसरण नोंदली गेली.

Loading...
Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply