Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘या’ राज्याने देशाच्या समोर ठेवला आदर्श; 13 तृतीयपंथी होणार पोलीस कॉन्स्टेबल

रायपुर :

Advertisement

मागच्या सोमवारी छत्तीसगढच्या पोलीस भरतीचा निकाल जाहीर झाला. यात 2 हजार 259 पदांवर सगळ्या राज्यांतून उमेदवारांची निवड झाली आहे. ज्यात 13 तृतीयपंथी आता पोलीस कॉन्स्टेबल बनणार आहेत. निकालात निवड झालेले पुरुष उमेदवार 1736, महिला उमेदवार 289 आणि तृतीयपंथी उमेदवार 13 आहेत.

Advertisement

सुरुवातीपासून नेहमीच समाजाने दूर लोटलेला आणि उपेक्षित राहिलेला समाज म्हणून तृतीयपंथी समाजाची ओळख आहे. खाजगी असो किंवा सरकारी त्यांना कुणीही कधीच नोकरी देण्यास तयार नसते. मात्र आता छत्तीसगढच्या पोलीसा दलाने, सरकारने देशासमोर एक वेगळा आदर्श मांडला आहे.

Advertisement

निवड झालेल्यापैकी एक असणारी सोनिया हीने सांगितले की, ही एक मोठीच संधी आहे. आम्ही पोलीस विभागाला धन्यवाद देऊ इच्छितो. या पोलीस दलाच्या पुढाकारानं आमच्या समाजाकडे पाहण्याची लोकांची दृष्टी बदलेल.

Advertisement

छत्तीसगढमध्ये निवड झालेल्या तृतीयपंथी उमेदवारांमध्ये दीपिका यादव, निशू क्षत्रिय, शिवन्या पटेल, नैना सोरी, सोनिया जंघेल, कृषी तांडी, सबुरी यादव, सुनील आणि रुची यादव, कोमल साहू, अक्षरा, कामता, नेहा आणि डोली यांचा समावेश आहे.  

Loading...
Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply