Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

पाहिला ‘रोबोट’ चित्रपट आणि खराब सामान वापरून शिक्षकाने केली ‘ही’ करामत; वाचा, भन्नाट आणि रंजक गोष्ट

तुमच्या घरचे किंवा नातेवाईक कधीतरी तुम्हाला म्हणाले असतील की, ‘चित्रपट बघून काहीही मिळू शकत नाही’. उत्तर प्रदेशच्या जौनपूर येथील संगणक शास्त्राचे शिक्षक दिनेश पटेल यांनी मात्र हा मुद्दा चुकीचा असल्याचे सिद्ध केले आहे. रजनीकांत यांच्या ‘रोबोट’ चित्रपटापासून प्रेरित होऊन दिनेशने स्वत:चा रोबोट बनविला असून तो 9 भारतीय आणि 38 परदेशी भाषा बोलू शकतो. त्यांनी रोबोचे नाव ‘शालू’ ठेवले आहे.

Advertisement

दिनेश पटेल आयआयटी (IIT) मुंबईच्या केंद्रीय विद्यालयात संगणक विज्ञान शिकवतात . रोबोट या चित्रपटाशिवाय त्याने हँगकॉन्गची हॅन्सन रोबोटिक्स या रोबोटिक्स कंपनीच्या ‘सोफिया’ रोबोटमधूनही प्रेरणा घेतली आहे. हा रोबोट तयार करण्यासाठी दिनेश यांनी बेकार असलेले सामान जसे कि, प्लास्टिक, कार्डबोर्ड, लाकूड आणि अ‍ॅल्युमिनियम वॅगर सारख्या वस्तूंचा वापर केला आहे. हा रोबोट तयार करण्यास दिनेशला 3 वर्षांहून अधिक कालावधी लागला आणि यासाठी सुमारे 50,000 खर्च आला.

Advertisement

या रोबोच्या खासियत म्हणजे,  हा देसी रोबोट हिंदी, भोजपुरी, मराठी, बांगला, उर्दू, गुजराती, तामिळ या भारतीय भाषांमध्ये बोलू शकतो. याव्यतिरिक्त, तो इंग्रजी, जर्मन, जपानी यासह 38 परदेशी भाषांमध्ये बोलण्यात माहिर आहे.

Advertisement

दिनेश यांनी सांगितले कि, शालू लोकांना अभिवादन करू शकते, त्यांच्या भावना दाखवू शकते, वर्तमानपत्र वाचू शकते आणि यासारख्या बर्‍याच गोष्टी करू शकते. शालूचा उपयोग शाळांमध्ये शिक्षक म्हणून आणि कार्यालयांमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून केला जाऊ शकतो.  

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Loading...
Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply