Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

मोबाईल वापरताना ‘या’ गोष्टी प्रत्येकानेच घ्या लक्षात; अन्यथा भोगावे लागतील गंभीर परिणाम

मोबाईल हा शब्द माहिती नाही, असा माणूस या जगात सध्या शोधूनही सापडणार नाही. आपण सगळे आता मोबाईलच्या अधीन झालेले आहोत. मोबाईल हा आपला २४ तासाचा जोडीदार बनला आहे.

Advertisement

सकाळच्या अलार्मपासून तर रात्रीच्या गाणे ऐकण्यापर्यंत मोबाईलच आपला साथी झाला आहे. सकाळी उठल्या उठल्या कितीतरी लोक मोबाईल वापरायला सुरु करतात. मग बाकीची कामे करतात. आजकालची तरून पिढी ही मोबाईलच्या आहारी गेली आहे. मोबाईल चार्जिंगला लावून वापरल्यामुळे कित्येकदा स्फोट घडले आहेत. मोबाईल गरम झाला तरी वापरल्यामुळे अनेक अनर्थ घडलेले आहेत. त्यामुळे या टिप्स वाचा, इतरांनाही वाचायला पाठवा.

Advertisement
  • उन्हात फिरताना मोबाईल उन्हाच्या संपर्कात येऊ देऊ नका.
  • मोबाईलसाठी जाड कव्हर वापरू नये. जाड कव्हरमुळे मोबाईल मधली उष्णता बाहेर पडत नाही. एकावेळी दोन तीन अॅप्सचा वापर करताना कव्हर काढून ठेवा.
  • मोबाईल जास्तवेळ चार्ज करू नका. यामुळे एक तर बॅटरीचं आयुष्य कमी होतं आणि त्याच बरोबर मोबाईलचं तापमान देखील वाढतं. जर चार्जिंग करताना मोबाईल गरम झाला तर चार्जिंग बंद करा.
  • प्रोसेसिंग पॉवर आणि ग्राफिक्सचा मोठ्या प्रमाणात वापर करणाऱ्या अॅप्स कमी वापर करा.
  • रात्रभर मोबाईल चार्ज करू नका. काही स्मार्ट फोन्स बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यावर चार्जिंग थांबवतात. नवीन मोबाईल घेताना अशा मोबाईल फोन्सची निवड करा. थंड होऊ द्या.
  • इंटरनेट वापरताना किंवा फोनवर बोलताना मोबाईल गरम झाला तर त्याचा वापर लगेचच थांबवा. कव्हर काढून त्याला थंड होऊ द्या.

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Loading...
Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply