Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

सचिन वाझेंच्या अडचणीत झाली मोठी वाढ; ‘त्या’ गोष्टीमुळे कुटुंबियांसह सगळेच गडबडले

मुंबई :

Advertisement

एपीआय सचिन वाझे (API Sachin Vaze )यांचा अंतरिम जामीन अर्ज ठाणे सत्र न्यायालयाने (Thane Court) फेटाळला आहे. त्यामुळे सचिन वाझे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. मनसुख हिरेन (Mansukh Hiren) मृत्यूप्रकरणात त्यांच्या पत्नीने सचिन वाझे यांनीच आपल्या पतीची हत्या केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे API सचिन वाझे संशयाच्या भोवऱ्यात आहेत.

Advertisement

याप्रकरणात सचिन वाझे यांनी ठाणे कोर्टात अर्ज केला होता. मात्र ठाणे सत्र न्यायालयाने सचिन वाझे याचा अंतरिम जामीन तात्पुरत्या काळासाठी फेटाळला आहे. 

Advertisement

अशातच त्यांनी ठेवलेल्या स्टेटसमधील मजकुरात जगाचा निरोप उल्लेख केलेला आहे. त्यांच्या या स्टेटसमधील मजकुरामुळे खळबळ उडाली आहे.

Advertisement

काय आहे तो मजकूर :-  

Advertisement

‘तीन मार्च २००४. साली मला खोट्या आरोपांखाली सीआयडीमधील काही जणांनी अटक केली होती. त्यावेळी माझ्याकडे १७ वर्षांचा कालावधी होता. आशा होती, धैर्य होतं, आयुष्य आणि नोकरीमधील अनेक वर्ष शिल्लक होती. मात्र आता माझ्याकडे आयुष्याची पुढील १७ वर्षे शिल्लक नाहीयत तसेच नोकरीची एवढी वर्षे आणि अशा पद्धतीने जगण्याचं धैर्यही नाहीय. मला वाटतं जगाचा निरोप घेण्याची वेळ जवळ आलीय.’

Advertisement

चौकशीच्या घेऱ्यात अडकलेले गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे सचिन वाझे यांची (sachin Vaze) दहशतवाद विरोधी पथक (ATS) ने तब्बल दहा तास चौकशी केली आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटके आणि धमकीचे पत्र असलेली स्कॉर्पिओ कार सापडली.

Loading...
Advertisement

याचा तपास वाझे यांच्याकडे सोपविण्यात आला. या स्कॉर्पिओ कारचा ताबा असलेल्या ठाण्यातील व्यापारी मनसुख यांचा मृत्यू झाला आणि वाझे संशयाच्या भोवऱ्यात सापडले. विरोधी पक्षाने त्यांचे निलंबन करुन अटकेची मागणी केली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा तपास राज्य दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपविला.  

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply