Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यावर गुन्हा दाखल; वाचा, काय आहे प्रकरण

मुंबई :

Advertisement

सध्या राज्याच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर अस्थिर वातावरण आहे. हिरेन, पूजा चव्हाण आणि अशी विविध नेत्यांची रोज काही न काही प्रकरणे समोर येत आहेत. अशातच आता एका भाजप बड्या नेत्यावर गुन्हा दाखल झाला असल्याचे वृत्त आहे.

Advertisement

महाविकास आघाडीच्या मंत्र्यांविरोधात भाजप नेते आक्रमक होत असताना दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूला एक भाजप आमदारावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने पुण्यासह राज्यात खळबळ उडाली आहे. वरळी येथे फ्लॅट बुक करण्यास भाग पाडत तो न देता तसेच पैसे भरण्यास धमकावून फसवणूक प्रकरणात हा गुन्हा दाखल झाला आहे.

Advertisement

मुंबई भाजपचे अध्यक्ष व आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासह त्यांचा मुलगा आणि इतरांवर न्यायालयाच्या आदेशाने खंडणी व फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Advertisement

याप्रकरणी मंगलप्रभात लोढा, अभिषेक लोढा (रा. अपोलो मिल कंपाउंड, महालक्ष्मी, मुंबई) तसेच ज्वाला रियल इस्टेट प्रायव्हेट लि. व मायक्रोटेक डेव्हलपर्स लि. यांच्याद्वारे सुरेंद्रन नायर यांच्यावर चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 384, 385, 406, 420, 120 (ब), 34 सह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 54 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. सर्व प्रकार 2013 ते मार्च 2021 या कालावधीत घडला आहे.  

Loading...
Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply