Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अखेर ‘या’ जिल्ह्यातही लॉकडाउन; वाचा, काय आहे चालू आणि काय बंद

औरंगाबाद :

Advertisement

औरंगाबाद शहरात कोरोना रुग्णांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान कोरोनाचा हाच संसर्गाचा दर कायम राहिला तर येत्या काही दिवसांमध्ये औरंगाबाद शहरामध्ये रुग्णांसाठी बेड सुद्धा उपलब्ध होऊ शकणार नाहीत. त्यामुळे प्रशासनाने लॉकडाऊन लावायला सुरुवात केली आहे.

Advertisement

नागपुर, अकोला नंतर आता औरंगाबादमध्येही लॉकडाउन करण्यात आला आहे. औरंगाबादेत आजपासून दोन दिवस कडक लॉकडाऊन करण्यात आला. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. यानुसार आज आणि उद्या दोन दिवस कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. 

Advertisement

औरंगाबादमध्ये शनिवार आणि रविवार असे दोन दिवस लॉकडाऊन असणार आहे. या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आणि एमआयडीसी वगळता सर्व बंद राहणार आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. वेरुळ-अजिंठा लेणीसह औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळं 4 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Loading...
Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply