Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक : विधानसभेत ‘त्या’ पक्षाच्या आमदाराने केला आत्महत्येचा प्रयत्न; वाचा, नेमका काय घडला प्रकार

दिल्ली :

Advertisement

ओडिशा विधानसभेत काल एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका भाजप आमदाराने चक्क विधानसभेतच आत्महत्येचा केल्याची घटना ओडिशा विधानसभेत घडली. सुभाष चंद्र पाणिग्रही असं या भाजपा आमदाराचं नाव असून ते देवगड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. 

Advertisement

थेट सॅनिटायझर पिऊन सुभाष चंद्र पाणिग्रही यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी विधनसभेत मोठा गडबड-गोंधळ उडाला.  संसदीय कामकाज मंत्री बिक्रम केशरी अरुखा आणि इतर आमदारांनी त्यांना रोखलं. तसेच त्यांच्या हातातून सॅनिटायझर हिसकावून घेतलं. 

Advertisement

का आणि कशामुळे घडला हा प्रकार :-

Advertisement

सरकार टोकन सिस्टम आणि बाजार समित्यांमधील चुकीच्या व्यवस्थापनासारखे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास अपयशी ठरलंय. शेतकरी धान्य खरेदीबाबत कायमच चिंताग्रस्त राहिला आहे. मात्र त्याकडे कोणीही लक्ष देत नसल्याचा गंभीर आरोप भाजपा आमदार सुभाष चंद्र पाणिग्रही यांनी केला आहे.

Advertisement

ओडिशा राज्य सरकारने आपल्यासमोर दुसरा कोणताही पर्याय ठेवला नाही. शेतकऱ्यांचा प्रश्न विधानसभेत वारंवार उपस्थित करुनही सरकार शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीकडे लक्ष देत नाही. त्यामुळेच आपण सॅनिटायझर पिण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याचा दावा आमदार पाणिग्रही यांनी केला आहे.  

Loading...
Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply