Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रवादी पुन्हा : भाजपमध्ये गेलेल्या ‘त्या’ आमदाराने घेतली अजित पवारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

मुंबई :

Advertisement

विधानसभेच्या निवडणुका ऐन रंगात आलेल्या असताना अनेक विश्वासू आणि जवळच्या नेत्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ सोडत शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत काहींना यश तर काहींना अपयश आले. मात्र आता पुन्हा एकदा ‘राष्ट्रवादी पुन्हा’ म्हणत अनेक नेत्यांची घरवापसी सुरू झालेली आहे.

Advertisement

अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि आता भाजप आमदार असलेले गणेश नाईक यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.  

Advertisement

दरम्यान गणेश नाईक यांनी सांगितले की, नवी मुंबई शहरात असे अनेक भूखंड आहेत; जे अजूनही महानगरपालिकेला मिळालेले नाहीत. त्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मी भेट घेतली.

Advertisement

लवकरात लवकर हे भूखंड नवी मुंबई महापालिकेला मिळावेत अशी मागणी मी त्यांच्याकडे केली. कारण हे भूखंड लोकांसाठी आहेत. लोकांसाठी घरांचा विषय महत्वाचा आहे. हे भूखंड नवी मुंबई महापालिकेला मिळणे गरजेचे असून हीच मागणी करण्यासाठी मी अजित पवार यांना भेटायला गेलो.  

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार 

Loading...
Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply