Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

सोन्याच्या दरात झाली ‘एवढी’ वाढ; वाचा, काय आहे ताजे दर

मुंबई :

Advertisement

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प नुकताच सादर केला. यात केंद्र सरकारने सोने आणि चांदीवरील कस्टम ड्यूटी कमी केली आहे. याचाच थेट परिणाम सोन्याच्या आणि चांदीच्या दरावर झाला असून सोन्याचांदीच्या दरात घसरण झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.  

Advertisement

जागतिक बाजारातील सोन्याच्या किमतींचा देखील स्थानिक बाजारभावांवर परिणाम होतो. परंतु बुधवारी जागतिक बाजारपेठेतील किंमत ही देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या किमतींपेक्षा वेगळी होती. 

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून स्वस्त होत असलेलं सोनं पुन्हा एकदा महाग झालेय. बुधवारी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे भाव (Gold Rate) 112 रुपयांनी वाढून 44,286 रुपयांवर पोहोचले. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, सोन्याचा भाव आधीच्या व्यापारात प्रति 10 ग्रॅम 44,174 रुपयांवर बंद झाला होता.

Advertisement

चांदीही 66,236 रुपयांवर बंद झाली. आधीच्या व्यापारात चांदीचा भाव प्रतिकिलो 66110 रुपये होता. स्पॉट मार्केटमध्ये सोन्याची किंमत 8 महिन्यांत विक्रमी दरावरून 13000 रुपयांपर्यंत खाली आलीय. ऑगस्ट 2020 मध्ये दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा स्पॉट किंमत 10 ग्रॅम 57008 रुपयांवर पोहोचली होती. ही आतापर्यंतची सोन्याची सर्वोच्च पातळी होती.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार 

Loading...
Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply