Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ शेतकरी योजनेस आता अनेक शेतकरी ठरणार अपात्र; वाचा, काय आहेत निकष

मुंबई :

Advertisement

पीएम शेतकरी सन्मान निधी योजना ही देशातील सर्व शेतकर्‍यांना जोडली गेलेली योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6000 रुपये तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात. 2000 रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांना पाठवले जातात.

Advertisement

आता मात्र या योजनेत अनेक शेतकरी अपात्र ठरणार आहेत. पीएम शेतकरी सन्मान निधीच्या वेबसाइटनुसार कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आणि कुणाला यातून वगळ्यात येणार हे स्पष्ट करण्यात आले आहे. 

Advertisement

या शेतकर्‍यांना वगळले जाणार :-

Advertisement
  1. संस्थात्मक शेतकरी
  2. असे शेतकरी कुटुंब ज्यामधील एक किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती पुढील श्रेणीत येतात- व्यावसायिक डॉक्टर, इंजिनिअर, वकील, सीए, आर्किटेक्ट मंडळी
  3. घटनात्मक पदावरील शेतकरी, आजी आणि माजी मंत्री, लोकसभा आणि राज्यसभा खासदार, आमदार, महापौर, नगराध्यक्ष, जिल्हापरिषदेचे अध्यक्ष हे सर्व या योजनेच्या बाहेर आहेत.
  4. केंद्र सरकार/ राज्य सरकार आणि PSUs मध्ये सध्या काम करत असणारे किंवा सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी (मल्टी टास्किंग स्टाफ /चतुर्थ वर्गीय आणि ग्रुप डी कर्मचारी सोडून)
  5. केंद्र आणि राज्य सरकारमधील 10 हजारांपेक्षा जास्त पेन्शन घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या शेतीला देखील याचा लाभ नाही.
  6. मागच्या वर्षी आयकर भरणारे शेतकरी देखील या योजनेच्या बाहेर आहेत.
  7. तुम्ही दुसऱ्याची जमिन भाड्याने घेऊन कसत असाल तरी या योजनेचा लाभ मिळणार नाही
  8. नोंदणी प्रक्रियेत मुद्दाम चूक करणाऱ्यांना देखील फायद्यापासून वंचित राहावं लागेल.

संपादन : स्वप्नील पवार 

Loading...
Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply