Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अजित पवारांची मोठी घोषणा; ‘त्या’ शेतकर्‍यांना मिळणार 50 हजार रुपये

मुंबई :

Advertisement

शेतकऱ्यांच्या मदतीबाबतचा प्रश्व विरोधी पक्षाकडून विचारला जात आहे. सरकार मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे. राज्य सरकार नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांची मदत करणार आहे.

Advertisement

कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर ही मदत केली जाईल, असे म्हणत आज उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी शेतकर्‍यांना 50 हजार रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा केली.

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. त्यावेळी या महाविकास आघाडी सरकारने अनेक आश्वासने दिली होती. नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर ५० हजार रुपयांपर्यंत मदत करण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते. मात्र नंतर आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे ही मदत करणे सरकारला शक्य झाले नव्हते. 

Advertisement

याच पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला होता. त्यानंतर महाविकास आघाडीने अखेर यावर निर्णय घेत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांची मदत करणार असल्याचे जाहीर केले.  

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार 

Loading...
Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply