Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

पुन्हा एकदा पाकिस्तानने अनुभवले ‘दिलदार’ भारताचे मोठेपण; घडला ‘हा’ प्रकार

मुंबई :

Advertisement

चीन आणि पाकिस्तान हे दोन्हीही देश कायमच गरज लागली की भारतापुढे हात पसरत असतात. भारतही कायम दिलदार मनाने त्यांना मदतीचा हात देतो. मात्र गरज संपली की हे दोन्ही देश पुन्हा गुरगुरायला सुरू करतात.

Advertisement

मधल्या काळात चीनच्या पाठोपाठ पाकिस्तानही मुजोर भूमिका घेत होता. चीनला वेळोवेळी झटके दिल्याने चीन अखेर भारतासमोर नरमला. आता चीननंतर पाकिस्तानही झक मारून नरमणार, असे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.

Advertisement

पाकिस्तान ((Pakistan) भारताविरोधात गेल्या काही दशकांपासून दहशतवाद पोसत आला आहे. या दहशतवाद्यांवर एवढा पैसा उधळला की आता त्यांच्याकडे खायलाही पैसे नाहीत. दररोज सीमेपलिकडून उखळी तोफा, गोळीबार ठरलेलाच.

Advertisement

या दहशतवादामुळे अनेक भारतीय जवानही शहीद झाले आहेत. तरीही भारताने नेहमी पाकिस्तानला मदत केली आहे. आजही कोरोनाच्या संकटात भारताने स्वत:ची गरज विसरून कंगाल झालेल्या पाकिस्तानला कोरोना लसीचे (Corona Vaccine) तब्बल 1.6 कोटी डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. 

Advertisement

यातून पुन्हा एकदा पाकिस्तानने भारताचे दिलदारपन अनुभवले आहे. पुण्याची कंपनी सीरम इंस्टीट्यूटमध्ये बनविण्यात येत असलेली ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेकाची लस पाकिस्तानसाठी उपलब्ध केली जाणार आहे. द ग्‍लोबल अलायंस फॉर वैक्‍सीन अँड इम्यूनाइजेशन (Gavi) द्वारे ही लस पाकिस्तानला उपलब्ध करून देण्यात येणार आहे.   

Loading...
Advertisement

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी 

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply