Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

पेट्रोलवाढीचा दणका; दुचाकीमध्ये 12 % घट, तर कारमध्ये अशी आहे परिस्थिती..!

मुंबई :

Advertisement

देशात सध्या पेट्रोल-डीझेल यांच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. केंद्र सरकारने कर संकलन आणि पेट्रोल कंपन्यांनी महसुलाचे संकलन करण्यासाठी या दोन्ही इंधनाचा वापर केला आहे. त्याचा फटका ऑटो सेक्टरमधील मोटारसायकलला बसला आहे.

Advertisement

फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशनने (फाडा) जारी केलेल्या आकड्यांतून स्पष्ट झाले आहे की,  फेब्रुवारीत देशात दुचाकी वाहनांची विक्री वार्षिक आधारावर १६.०८% घटली आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये १०,९१,२८८ दुचाकी वाहने विकली, फेब्रुवारी २०२० मध्ये १३,००,३६४ दुचाकी विकल्या होत्या. 

Advertisement

तर, फेब्रुवारी २०२१ मध्ये एकूण २,५४,०५८ कार विकल्या. वर्षभरापूर्वी हा आकडा २,२९,७३४ कार होता. सेमी कंडक्टरच्या टंचाईने पुरवठा साखळी कमकुवत झाली, अन्यथा कारच्या विक्रीत आणखी वाढ झाली असती. 

Advertisement

यामुळे बसला आहे विक्रीला फटका :

Advertisement
  • देशातील काही भागांत कोविड-१९चा संसर्ग पुन्हा वाढल्यामुळे सामान्य ग्राहक अनावश्यक खर्च टाळत आहेत.
  • शाळा-महाविद्यालय आणि अन्य शैक्षणिक संस्था बंद असल्यामुळे दुचाकींची चौकशी कमी आहे.
  • पेट्रोलच्या वाढत्या किमतीमुळेही लोक सध्या दुचाकी खरेदी टाळत आहेत. 

सेमी कंडक्टरच्या टंचाईने पुरवठा साखळी कमकुवत झाली आहे. गाड्यांची उपलब्धता नसल्याने विक्रीत २० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे. ऑटो रिटेल इंडस्ट्री सरकारच्या स्क्रॅपिंग धोरणाला अंतिम रूप देण्याची वाट पाहत आहे, असे डीलर्सचे म्हणणे आहे.

Loading...
Advertisement

संपादन : सचिन पाटील     

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply