Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

15 मार्चनंतर महाराष्ट्रातील ‘या’ शहरात लागणार नाही एकही लग्न; वाचा, काय झालाय नेमका निर्णय

नाशिक :

Advertisement

राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग पुन्हा गतीने पसरतो आहे. कोरोना संसर्ग वाढत असतांना महापालिका प्रशासनानेही जोरदार पद्धतीने कोरोना चाचण्यांची गती वाढवलेली आहे. कोरोनाच्या संसर्गाचे थैमान जगभरात सरु असताना दुसरीकडे कोरोनाचे नवीन स्ट्रेन आढळत असल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.   

Advertisement

नाशिक, औरंगाबाद अशा अनेक शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. कोरोना वाढता प्रसार वेळीच रोखता यावा यासाठी नाशिक जिल्हा प्रशासनाने शनिवार आणि रविवार असे दोन दिवस जिल्ह्यातील बाजारपेठा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

या दरम्यान केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. या काळात नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. विशेष म्हणजे येत्या १५ मार्चनंतर नाशिकमध्ये लग्न, समारंभ आणि इतर कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे.

Advertisement

जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या नव्या नियमांनुसार किंवा निर्बंधांनुसार येत्या १५ मार्चपासून मंगल कार्यालये, हॉल्स, लॉन्स आणि इतर ठिकाणी ठिकाणी लग्न समारंभ करता येणाक नाहीत. तसेच इतरही गर्दी जमा होईल असे कार्यक्रम आयोजित करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Loading...
Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply