Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

म्हणून अजूनही पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत होणार नाहीत बदल; वाचा, काय म्हणालेत केंद्रीय मंत्री

दिल्ली :

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून इंधन दरात सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये होणारी ही वाढ पाहता देशातील अनेक शहरांत शंभरी गाठली आहे.

Advertisement

या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झालेले आहे. इंधन दरवाढ कधी थांबणार, याकडे लोकांचे लक्ष लागलेले आहे. अशातच आता  पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवरच अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी मोठे विधान केले आहे.

Advertisement

पेट्रोल आणि डिझेल वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी जीएसटी परिषदेकडून शिफारस आल्यास त्यावर विचार केला जात असतो. परंतु, अशा प्रकारची कोणतीही शिफारस जीएसटी परिषदेकडून करण्यात आली नसल्याचं अनुराग ठाकूर यांनी स्पष्टं केलं आहे. 

Advertisement

आता जोपर्यंत जीएसटी परिषदेकडून शिफारस होणार नाही, तोपर्यंत या इंधन दरात बदल होणार नाहीत, असे स्पष्टपणे दिसत आहे. भारतीय स्टेट बँकेच्या अर्थविश्लेषकांनी पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून नुकताच केंद्र सरकारला एक सल्ला दिला होता.

Advertisement

त्यानुसार पेट्रोल आणि डिझेल वस्तू आणि सेवा कराच्या कक्षेत आणल्यास त्याचे दर 75 रुपये लिटर पर्यंत खाली येतील असंही सांगितलं होतं. त्यावर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री यांनी उत्तर देत सर्व चर्चांना विराम दिला आहे.

Loading...
Advertisement

संपादन : सुनील झगडे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply