Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

उन्हाने केले नको नको; महाराष्ट्रात ‘त्या’ठिकाणी आहे सर्वाधिक ऊन

मुंबई :

Advertisement

दिवसेंदिवस आता गरमी वाढ लागली आहे. माळ्यावर असलेले टेबल फॅन आता खाली आले आहेत. थंडीने बाय बाय केला असून आता उन्हाने आपला झटका दाखवायला सुरूवात केली आहे. राज्यात हिवाळानंतर पुन्हा उन्हाची तीव्र झळ जाणवू लागली आहे. अशातच आता सर्वांना असे वाटत असेल की, आपल्या शहरातच सर्वात जास्त ऊन आहे.

Advertisement

राज्यात विदर्भात सर्वाधिक उष्णतेची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून विदर्भ, मराठवाड्यातील तापमान चाळीशी गाठत आहे. त्यामुळे दुपारच्या सुमारास नागरिकांना घराबाहेर पडणेही अवघड होत आहे. एवढेच नाही तर 11 नंतर अंगाची लाही लाही व्हायळा सुरुवात झाली आहे.

Advertisement

सोमवारी विदर्भाचा पारा ४० अं.से वर पोहचला होता. तर विदर्भातील ब्रह्मपुरी भागात देशातीव सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद झाली आहे. बह्मपुरीत ४०.१ एवढ्या उष्ण तापमानाची नोंद एकट्या सोमवारी झाली आहे.

Advertisement

त्याखालोखाल अकोल्यात ३९.५ तर चंद्रपुरात ३९.४ अं.से इतक्या उष्ण तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे सोमवारी एकट्या विदर्भातील तीन शहरांच्या तापमानाची नोंद देशातील देशातील सर्वाधिक उष्ण तापमान म्हणून झाली आहे. 

Advertisement

मार्च महिन्यापासूनचं तापमान वाढीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे एप्रिल, मेमध्ये तापमानाचा पार कुठवरं पोहचेल असा यक्ष प्रश्न विदर्भकरांना पडला आहे.

Loading...
Advertisement

संपादन : सुनील झगडे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply