Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

नगरच्या अर्बन बँक घोटाळ्यात ‘या’ जिगरबाज अधिकार्‍याची एंट्री; माजी खासदारासह ‘या’ नेत्यांमध्ये खळबळ

मुंबई :

Advertisement

नगर अर्बन बॅँकेचे माजी चेअरमन दिलीप गांधी यांनी गैरकृत्याची परिसिमा गाठलेली दिसून येत असून, त्यांनी चेअरमनपदाचा गैरवापर करून कर्जदारांबरोबर संगनमत करून स्वतःच्या लाभासाठी बॅँकेच्या ठेवींची अफरातफर आणि अपहार केल्याचे दिसून येत आहे, असे स्पष्ट मत रिझर्व्ह बँकेने नोंदविले होते.

Advertisement

विशेष म्हणजे अनेक गंभीर तक्रारींची फिर्याद दिलेली नसल्याचेही आपल्या अहवालात नमूद केले आहे. यावरून माजी खा. दिलीप गांधी यांच्या कारभारामुळे बॅँक आर्थिक अडचणीत तर आली आहेच, पण त्यांच्यासोबत असलेले संचालक देखील मोठ्या अडचणीत सापडले आहेत.

Advertisement

दरम्यान आता नगर अर्बन बँकेच्या पिंपरी-चिंचवड शाखेतील बोगस कर्ज प्रकरणाच्या तपासाच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त आणि नगरचे माजी जिल्हा पोलिस अधीक्षक कृष्णप्रकाश यांची एंट्री झाली आहे. 

Advertisement

कृष्णप्रकाश यांचा तापास एकाच गुन्ह्यापुरता राहणार की त्यानिमित्ताने बँकेतील गैरप्रकारची नगर पोलिसांकडूनही दुर्लक्षित राहिलेले प्रकरणेही ते बाहेर काढणार, याची चर्चा नगरमध्ये आहे.

Advertisement

भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्या अध्यक्षपदाच्या काळातील या गुन्ह्याचा तपास सुरू असून त्यांचेही नाव यामध्ये पुढे आल्याने त्यांचीही चौकशी केली जाणार असल्याचे सांगण्यात येते. 

Advertisement

काय होते प्रकरण :-

Loading...
Advertisement

बँकेच्या पिंपरी-चिंचवड शाखेत प्रत्येकी ११ कोटी रुपयांची दोन बोगस कर्ज प्रकरणे करण्यात आली आल्याचा आरोप आहे. बँकेचे अधिकारी महादेव पंढरीनाथ साळवे (वय रा. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. मिळकतीचे बनावट मूल्यांकन सादर करून बँकेची फसवणूक करण्यात आली होती.

Advertisement

संपादन : सुनील झगडे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply