Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

पण तुम्ही सह्याद्रीच्या कड्यासारखे टणक राहीलात : राज ठाकरे

मुंबई :

Advertisement

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 15 वा वर्धापन दिन असून मनसेने सध्या महाराष्ट्रात असलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा वर्धापन दिन सोहळा रद्द केला आहे. पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सकाळी त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून मनसे कार्यकर्त्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. किल्ल्याला तोरण माळा, उगवता सूर्य आणि भरारी घेणारा पक्षी या सांकेतिक चिन्हांमधून मनसेने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा नवा उत्साह आणि काम करण्याची उर्मी भरण्यासाठी संदेश दिल्याचे म्हटले जात आहे.

Advertisement

आजच्या या दिनी पदाधिकारी, कार्यकर्ते यांना शुभेच्छा आणि मार्गदर्शन करण्यासाठी राज ठाकरे यांनी डिजीटल प्लॅटफॉर्मचा वापर करत एक ॲाडिओ मॅसेज पक्षाच्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहचवला. या ॲाडिओ मॅसेज मध्ये राज ठाकरे यांनी येणाऱ्या काळात पक्षाला भरभरून यश मिळण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला आहे.

Advertisement

असा होता संदेश :-

Advertisement

आपण एकत्र पाहिलेल्या स्वप्नाला आज 15 वर्षे पूर्ण झाली आहेत. 15 वर्षापूर्वी एका ध्येयाने बाहेर पडून पक्षाची स्थापना केली त्यावेळी मनात धाकधूक होती. महाराष्ट्रासाठी काहीतरी नवीन करण्यासाठी केलेली धडपड तुम्ही आणि लोकं हे कसं स्वीकारणार याची शंका होती.

Advertisement

19 मार्च 2006 पक्ष स्थापना केली. त्या दिवशी शिवाजी पार्कवरची सभा आणि समोर असलेला अलोट जनसागर पाहिला आणि मनातील सर्व शंका दूर झाल्या. मनसे सैनिकांची अचाट शक्ती होती. त्यांचा माझ्यावर अढळ विश्वास आहे. कितीही संकटं, खचखळगे आले तरी मनसे सैनिक रुपी ही शक्ती माझ्यासोबत टिकून आहे. आपल्यातील काहीजण सोडून गेले, त्यांना त्यांचा निर्णय लखलाभ. पण तुम्ही सह्याद्रीच्या कड्यासारखे टणक राहीलात.

Advertisement

मनापासून सांगतो, 15 वर्षात जे काही तुम्ही करुन दाखवलं ते अचाट आहे. कोणतीही धनशक्ती मागे नसताना तुम्ही जे काही केलं ते कौतुकास्पद आहे. तुम्ही हजारो आंदोलनं, मोर्चे, अटकवाऱ्या केल्या. हे सर्व कशासाठी? आपल्या भाषेसाठी, मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि स्वधर्म रक्षणासाठी.

Loading...
Advertisement

आपण निवडणुकीत यश पाहिलं, पराभव पाहिला. पण या पराभवानंतरही तुमच्या मनातील लढण्याची उर्मी कमी झाली नाही याचा मला खरोखरच अभिमान वाटतोय. महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाला जेव्हा असं वाटतं की आपला प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण पक्षच सोडवू शकतो त्यावेळी यातच भविष्याच्या यशाची बीजं रोवली आहेत हे विसरू नका. तुमचे श्रम वाया जाणार नाही हे नक्की

Advertisement

संपादन : सुनील झगडे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply