Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

फडणवीस की ठाकरे : कुणाच्या काळात झालेत महिलांवर सर्वाधिक अत्याचार; वाचा, संपूर्ण अहवाल

मुंबई :

Advertisement

सध्या विविध महिला संबंधित प्रकरणांमुळे महाविकास आघाडी सरकार चर्चेत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला सुरक्षित नसल्याचा आरोप केला जात आहे. अशातच एक महत्वाची माहिती आपल्यासमोर आलेली आहे.

Advertisement

ही माहिती लक्षात घेता माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापैकी कुणाच्या काळात महिला अत्याचार सर्वात जास्त झाले, हे लक्षात येईल. फडणवीस सरकारच्या काळात महिला व बालकांवरील अत्याचाराचा वाढता आलेख महाविकासआघाडी सरकारच्या काळात हजारोंच्या संख्येने घटल्याची बाब यंदाच्या आर्थिक पाहणी अहवालात समोर आली आहे.

Advertisement

राज्यात सत्ता परिवर्तन होण्याआधी फडणवीस सरकारच्या काळात 2018 साली महिला अत्याचाराचे 35501 तर 2019 साली 37112 इतके गुन्हे नोंदवण्यात आले होते. महाविकासआघाडी सरकार आल्यानंतर 2020 साली मात्र महिला अत्याचाराच्या प्रमाणात 10 हजारांपेक्षा जास्त संख्येने घट झाली असून महिला अत्याचाराच्या 26586 इतक्या गुन्ह्यांची झाली आहे.

Advertisement

2018 मध्ये बालकांवरील अत्याचाराचे 15544 तर 2019 मध्ये 17517 गुन्हे नोंद झाले होते. 2020 साली मात्र बालकांवरील अत्याचाराचे हे प्रमाण तब्बल 6 हजारांनी घटून बालकांवरील अत्याचाराच्या 11154 गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

Advertisement

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी 

Loading...
Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply