Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Maharashtra Budget 2021 Updates : अर्थसंकल्पातील कृषी क्षेत्रासाठीच्या 9 मोठ्या घोषणा; ज्यामुळे कृषी क्षेत्राला मिळणार चालना

मुंबई :

Advertisement

महाविकास आघाडी सरकाच्या काळातील दुसरा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. कोरोना सारख्या अडचणीच्या काळात शेतीक्षेत्रानं सावरल्याचं सभागृहात सांगितलं. अर्थमंत्र्यांनी शेतीक्षेत्रासाठी अर्थसंकल्पीय भाषणात विविध योजनांविषयी माहिती दिली.

Advertisement

3 लाख रुपये मर्यादेपर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या व त्याची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्जपुरवठा येईल, असं अजित पवार म्हणाले.

Advertisement

जाणून घेऊया यंदाच्या अर्थसंकल्पातील कृषी क्षेत्रासाठीच्या घोषणा –

Advertisement
  1. चार वर्षात बाजारसमित्यांसाठी 2 हजार कोटी,
  2. कृषी पंप जोडणी धोरण राबवणार, कृषीपंप जोडणीसाठी महावितरणला 1500 कोटी रूपये. 
  3. विकेल ते पिकेल या धोरणाद्वारे 2100 कोटींची खरेदी.
  4. संत्रा उत्पादकांसाठी नाशिक जिल्ह्यात अन्नप्रक्रिया उद्योग उभारणार, 500 भाजीपाला रोपवाटिका उभारणार.
  5. शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी सरकार प्रयत्न करणार, 4 कृषी विद्यापीठांना संशोधनासाठी दरवर्षी 200 कोटी देणार.
  6. 42 हजार कोटींचे यंदा पीक कर्ज वाटले, 3 लाख रूपयांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के दराने.
  7. राज्यात 278 सिंचन प्रकल्पांची कामं सुरू, 26 सिंचन प्रकल्पात 21,698 कोटी
  8. गोसेखुर्दसाठी 1 हजार कोटी, जलसंपदा विभागाचे प्रकल्प पूर्ण करण्यात येईल.
  9. बळीराजा जलसिंचन प्रकल्पांतर्गत 91 प्रकल्पांची कामं.

संपादन : स्वप्नील पवार

Loading...
Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply