Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Maharashtra Budget 2021 LIVE Updates : पुणे- नाशिक प्रवास आता होणार अवघ्या 2 तासात; पहा, अजितदादांनी केलीय काय घोषणा

मुंबई :

Advertisement

काही दिवसांपूर्वी महारेलच्या पुणे-नाशिक रेल्वे मार्गाला अखेर रेल्वे मंत्रालयाची मंजुरी मिळालेली होती. अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर आता लोक पुणे ते नाशिक हा प्रवास फक्त २ तासात करू शकणार आहेत. जवळपास अडीचशे किलोमीटरचे हे अंतर अगदीच कमी वेळात पार पडणार आहे.

Advertisement

अशातच आता हा प्रवास लोकांना लवकर करता यावा, यासाठी पुणे-नाशिक या दोन शहरांदरम्यानच्या प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी राज्यातकडून १६ १३९ कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. आता  मिळाल्यावर लवकरात लवकर लोक पुणे ते नाशिक हे अंतर पार करू शकणार आहेत. या निर्णयाने अनेक लोकांचा प्रवास सुकर होणार आहे.

Advertisement

नाशिकवरून पुण्याला जाणाऱ्या लोकांची संख्या खूप आहे. ही रेल्वे सेवा लवकर सुरु झाल्यास अनेक लोक दररोज ये-जा करण्यालाही प्राधान्य देऊ शकतात. या निर्णयाने सातत्याने नाशिक-पुणे प्रवास करणाऱ्या लोकांना आता दिलासा मिळाला आहे. यामुळे अनेक लोकांना व्यवसायाच्या संधीही उपलब्ध होणार आहेत.

Advertisement

तसेच समृद्धी महामार्ग आणि नाशिक-मुंबई मार्गावर मेगा इलेक्ट्रीक चार्जिंग सेंटर उभारणार असल्याचेही पवार यांनी सांगितले. उद्योग विभागासाठी 3500 कोटी रुपये तर 25 हजार मेगावॅटचे अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे.  

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Loading...
Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply