Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Maharashtra Budget 2021 Updates : घर खरेदी करणार्‍यांना खुशखबर; अर्थसंकल्पात महाविकास आघाडी सरकारने केली मोठी घोषणा

मुंबई :

Advertisement

महाराष्ट्र अर्थसंकल्प 2021-22  (Maharashtra Budget 2021) उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. राज्यातील महाविकासआघाडी सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुपारी दोन वाजता विधानसभेत अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. अर्थराज्यमंत्री शंभूराज देसाई हे विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करतील.

Advertisement

स्त्री नसते केवळ वस्तू, ती असते नवनिर्मितीची गाथा जिथे आपण सर्वांनी टेकवावा माथा, असं म्हणत अजित पवारांनी एक घोषणा केली. नवीन घरं विकत घेताना गृहिणीच्या नावावर केल्यास मुद्रांक शुल्काच्या प्रचलित दरामध्ये सवलत दिली जाणार. पण, घर महिलेचा नावावर असलं पाहिजे, असं पवार म्हणाले. 

Advertisement

मुलींच्या शिक्षणासाठी ग्रामीण तालुक्यातील मुलींना मोफत एसटी प्रवास. यासाठी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या नावाने नव्या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. घरकाम करणाऱ्या महिलांची नोंदणी करून त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना आहे. संत जनाबाई सामाजिक कल्याण योजनेसाठी २५० कोटी रुपये राखीव असणार आहेत.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Loading...
Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply