Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘या’ तारखेपासून रंगणार आयपीएलचा थरार; वाचा, कसे आहे संपूर्ण नियोजन

मुंबई :

Advertisement

काही दिवसांपूर्वी आयपीएलच्या खेळाडूंचा लिलाव झाला. आता आयपीएलचे नियोजन कधी समोर येणार, याकडे क्रिकेट चाहते डोळे लावून बसले होते. अखेर आता आयपीएलचा थरार नेमका कधी रंगणार, याची माहिती समोर आली आहे.    

Advertisement

आयपीएल लिलावानंतर खेळाडूंसह क्रिकेट चाहत्यांसह ही आयपीएल खास असणार आहे. कारण कोरोनानंतर पहिल्यांदाच आयपीएलचं आयोजन हे भारतात केलं जाणार आहे. दरम्यान आयपीएलचा थरार हा भारतातील ६ राज्यात रंगणार आहे. याआधी फक्त ५ शहरांची नावं निश्चित होती. तर मुंबईबाबत निर्णय झाला नव्हता.

Advertisement

इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल 2021) च्या 14 व्या मोसमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आयपीएल 2021 ची सुरुवात 9 एप्रिलपासून होणार असून 30 मे रोजी अंतिम सामना रंगणार आहे. यंदा आयपीएल 2021 चा मोसम 51 दिवस रंगणार असून हिंदुस्थानमध्येच सर्व लढती होणार आहेत, असे वृत्त ‘ टाइम्स ऑफ इंडिया ‘ने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. 

Advertisement

गव्हर्निंग काऊन्सिलच्या सदस्याने एनआय या वृत्तसंस्थेला याबाबतची माहिती दिली. ‘आयपीएल १४ ला येत्या बैठकीत मंजुरी मिळेल. त्यानुसार ९ एप्रिलला आयपीएलचा यंदाचा हंगाम सुरु होण्याची आशा आहे. हे सामने कुठे भरवायचे याबाबत पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत ठरवलं जाईल’ असं त्यांनी सांगितलं.

Advertisement

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

Loading...
Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply